घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या वॉटर मेट्रो सेवेचे उद्घाटन; पाहा कशी आहे?

पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या वॉटर मेट्रो सेवेचे उद्घाटन; पाहा कशी आहे?

Subscribe

'देशातील सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने आणखी एक प्रयत्न करण्यात आला आहे. स्थानिक परिस्थितीला अनुरूप 'मेड इन इंडिया' सोल्यूशन्स देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील पहिल्या वॉटर मेट्रो सेवेचे उद्घाटन केले. पोर्ट सिटी कोचीमध्ये बांधण्यात आलेली मेट्रो कोची शहराला जवळपासच्या 10 बेटांशी जोडणारी आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात हायकोर्ट-वायपिन टर्मिनल्सपासून वायटीला-कक्कनड टर्मिनल्सपर्यंत सेवा सुरू करण्यात येणार आहे. (Inauguration of the country first water metro service by Prime Minister Modi In Kochi)

वॉटर मेट्रो प्रकल्प इतर राज्यांसाठी आदर्श

- Advertisement -

‘देशातील सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने आणखी एक प्रयत्न करण्यात आला आहे. स्थानिक परिस्थितीला अनुरूप ‘मेड इन इंडिया’ सोल्यूशन्स देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सेमी हायस्पीड गाड्या असोत, रो-रो फेरी असोत, रोप-वे असोत. जिथे गरज आहे तिथे तशी यंत्रणा तयार केली जात आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

‘कोची वॉटर मेट्रोचा प्रकल्पही ‘मेड इन इंडिया’ आहे. तो अद्वितीय आहे. वॉटर मेट्रोमुळे कोचीच्या आसपासच्या अनेक बेटांवर राहणाऱ्या लोकांना स्वस्त आणि आधुनिक वाहतूक उपलब्ध होईल. यामुळे कोचीची वाहतूक समस्याही कमी होणार असून बॅक वॉटर टुरिझमलाही नवे आकर्षण मिळणार आहे. केरळमध्ये होत असलेला हा प्रयोग इतर राज्यांसाठीही आदर्श ठरेल’, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

- Advertisement -

‘अशी’ आहे पहिली वॉटर मेट्रो

  • वॉटर मेट्रो प्रकल्पाची कोचीन शिपयार्ड लिमिटेडने निर्मिती केली आहे. सुरुवातीला यात 8 इलेक्ट्रिक हायब्रीड बोटी असतील.
  • एकूण, कोची वॉटर मेट्रो प्रकल्पात 78 इलेक्ट्रिक बोटी आणि 38 टर्मिनल असतील.
  • केरळ सरकारने जर्मनीच्या KFW च्या सहकार्याने या प्रकल्पाला निधी दिला आहे. यामध्ये 1,137 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
  • वॉटर मेट्रोवरील प्रवासाचे किमान भाडे 20 रुपये आहे. त्यात साप्ताहिक आणि मासिक पासचीही सुविधा असेल.
  • यामध्ये प्रवास करण्यासाठी साप्ताहिक भाडे 180 रुपये, मासिक भाडे 600 रुपये, तर तीन महिन्यांचे भाडे 1500 रुपये असेल.
  • पहिल्या टप्प्यात, KWM सेवा कोचीमधील हायकोर्ट-वायपिन टर्मिनल्स आणि व्यत्तिला कक्कनड टर्मिनल्स दरम्यान सुरू होईल.
  • वॉटर मेट्रो दररोज 12 तास सेवा देणार आहे. ते प्रत्येक 15 मिनिटांच्या अंतराने धावेल.
  • ही वॉटर मेट्रो पर्यावरणपूरक, विजेवर चालणारी आणि दिव्यांगांसाठी सुरक्षित असेल.
  • या प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या सर्व बोटी वातानुकूलित असतील, त्यांना रुंद खिडक्या असतील, जेणेकरून लोकांना केरळच्या बॅकवॉटरचे दर्शन घेता येईल.

तुम्ही डिजिटल पद्धतीनेही तिकीट बुक करू शकता

‘कोची-1’ कार्ड वापरून प्रवासी कोची मेट्रो आणि वॉटर मेट्रो या दोन्ही मार्गांनी प्रवास करू शकतात. याशिवाय ते डिजिटल पद्धतीनेही तिकीट बुक करू शकतात.


हेही वाचा – कर्नाटकात भाजपाला संपूर्ण बहुमत मिळेल; देवेंद्र फडणवीसांना विश्वास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -