घरताज्या घडामोडीकोरोना संकट दूर कर, शेतशिवारात, घराघरात समृद्धी येऊदे, अजित पवार यांचं पांडुरंगचरणी...

कोरोना संकट दूर कर, शेतशिवारात, घराघरात समृद्धी येऊदे, अजित पवार यांचं पांडुरंगचरणी साकडं

Subscribe

पांडुरंगाच्या कृपेने कोरोनाचे संकट लवकरच संपेल आणि आपण सर्वजण वारीने पंढरपूरला जाऊ शकू

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे यंदाही आषढी वारीवर कोरोनाचं सावट आहे. राज्यातील तमाम वारकऱ्यांना पुन्हा एकदा वारीसाठी निर्बंध घातल्यामुळे जाता आले नाही. वारकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. परंतू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरात समृद्धी आणि राज्यात यंदा पाऊसपाणी चांगला होऊ दे असं पांडुरंग चरणी साकडं घातलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त अजित पवार यांच्याकडून ‘बा पांडुरंगाच्या’ आणि ‘माता रुक्मिणीच्या’ चरणी वंदन करण्यात आलं आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरच्या ‘बा पांडुरंगाच्या, माता रुक्मिणीच्या’ चरणी वंदन केले असून समस्त वारकरी बांधवांना, राज्यातील नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “यंदा राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊदे. माझ्या राज्यातला बळीराजा सुखी होऊदे. त्याच्या शेतशिवारात, घराघरात धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी येऊदे. बा पांडुरंगा, जगावर आलेलं कोरोनाचं संकट लवकर दूर कर. सर्वांना निरोगी, सुखी, समाधानी, आनंदी ठेव”, असं साकडंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बा पांडुरंगाच्या आणि माता रुक्मिणीच्या चरणी घातलं आहे.

- Advertisement -

आषाढी एकादशीनिमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राची संतपरंपरा, पांडुरंगभक्तीचा वसा आणि वारसा पुढे नेणाऱ्या तमाम वारकरी माऊलींनाही वंदन केले आहे. समाजातले सगळे भेदाभेद नष्ट करुन, बा पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने, सर्वांना एकत्र, समानतेच्या पातळीवर आणणारी पांडुरंगभक्तीची, पंढरपूरवारीची परंपरा आपले आध्यात्मिक, सांस्कृतिक वैभव आहे. हे वैभव सांभाळून पुढच्या पिढीकडे द्यायचं आहे. बा पांडुरंगाच्या कृपेने कोरोनाचे संकट लवकरच संपेल आणि आपण सर्वजण वारीने पंढरपूरला जाऊ शकू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरकडे रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आण त्यांची पत्नी रश्मी ठाकरे पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाची पुजा करण्यात येणार आहे. भर पावसात मुख्यमंत्री ठाकरे रोड मार्गाने पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. मुसळधार पावसामुळे हवाई मार्गाने जाता येणार नसल्यामुळे उद्धव ठाकरे स्वतः ड्रायव्हिंग करत पंढरपूरला गेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -