घरमहाराष्ट्रअमित ठाकरेंनी सपत्नीक शिर्डीच्या साईबाबांचं घेतलं दर्शन

अमित ठाकरेंनी सपत्नीक शिर्डीच्या साईबाबांचं घेतलं दर्शन

Subscribe

साईबाबांच्या समाधीसोबत त्यांनी द्वारकामाई मंदिर आणि चावडीचंदेखील दर्शन घेतलं. दरम्यान विवाहापूर्वी अमित यांनी मितालीसोबत साईबाबांचं दर्शन घेतलं होतं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आज पत्नी मितालीसह शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत काही मित्रपरिवारसुद्धा सोबत होता. यावेळी साईबाबांच्या समाधीसोबत त्यांनी द्वारकामाई मंदिर आणि चावडीचंदेखील दर्शन घेतलं. दरम्यान विवाहापूर्वी अमित यांनी मितालीसोबत साईबाबांचं दर्शन घेतलं होतं.

विवाहानंतर पहिल्यांदाच साईंच्या चरणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा २७ जानेवारी रोजी मिताली बोरुडे हिच्यासोबत परळच्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये विवाह पार पडला. या लग्न समारंभाला राजकारण्यांसोबतच चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीसुद्धा हजेरी लावली होती. दरम्यान आज लग्नानंतर पहिल्यांदाच अमित ठाकरे यांनी पत्नी मिताली सोबत साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी अमित ठाकरे यांच्यावर जमावाच्या नजरा खिळल्या होत्या. अनेकांनी अमित ठाकरे यांच्यासोबत फोटोसेशन केले. तर काहींनी सेल्फीसुद्धा घेतल्या. पण यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलणे मात्र अमित ठाकरेंनी टाळले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागणारे सरकार आराध्य दैवतालाच विसरले’

असे जुळले अमित आणि मितालीचे

मिताली ही मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांची मुलगी आहे. बी.जी. सोमानी आणि वांद्र्याच्या फॅशन इन्स्टिट्यूटमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण पूर्ण केलं. एवढेच नाही तर राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी आणि मिताली या दोघीही एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. मितालीने उर्वशी ठाकरेंसोबत द रॅक नावाचं बुटीक सुद्धा सुरु केलं आहे. यामुळे मिलालीचं कृष्णकुंजवर येण-जाणं सुरु होतं. त्यातच अमित आणि मितालीचं जुळलं आणि शेवटी राज आणि शर्मिला ठाकरे तसेच मितालीच्या आई-वडिलांनीदेखील दोघांच्या लग्नाला संमती दिली.


हे वाचा – एका हिंदू शेड्यूल्ड कास्ट भक्ताची गोष्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -