घरताज्या घडामोडीNCP : महायुतीतील नेत्यांची पक्षांतर्गत अदलाबदली; शिरुरसाठी अढळराव 26 तारखेला राष्ट्रवादीत

NCP : महायुतीतील नेत्यांची पक्षांतर्गत अदलाबदली; शिरुरसाठी अढळराव 26 तारखेला राष्ट्रवादीत

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शिवाजीराव अढळराव पाटील यांचा 26 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश होणार आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माहिती दिली.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शिवाजीराव अढळराव पाटील यांचा 26 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश होणार आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शिवाजीराव अढळराव पाटील यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान बैठकही झाली. या बैठकीला अजित पवार यांच्यासह शिवाजीराव अढळराव पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. या बैठकीत अढळराव पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. (cm eknath shinde shiv sena adhalrao patil will join NCP on 26th)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवाजीराव अढळराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अढळराव पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत माहिती दिली. त्यानुसार, “मंगळवार, 26 मार्च रोजी शिवाजीराव अढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. हा पक्षप्रवेश सोहळा मोठा होणार असून, अढळराव पाटील आणि त्यांचे सहकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. पक्षप्रवेश हा शिरूरमध्येच होणार आहे. अढळरावांच्या प्रवेशामुळे पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढण्यास मदत होईल”, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

“महायुतीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आज संध्याकाळी जागापाटपाबाबत शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच, ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचा अनुभव असलेल्या अढळराव पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे त्याचा अर्थ तुम्ही काढू शकता. याचाच अर्थ शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव अढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे”, असेही सुनील तटकरे यांनी सांगितले.

“यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने आम्ही विजय मिळवणार आहोत. शिरूरमधील आंबेगाव परिसरात अढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या प्रचाराचा नारळही तेव्हाच फोडणार आहे”, असेही सुनील तटकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Ram Mandir : VIP दर्शनाच्या नावाखाली रामभक्तांची लूटमार; ट्रस्टकडून धक्कादायक प्रकाराचा खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -