Tuesday, April 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक, कोरोनासंदर्भात घेणार आढावा

मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक, कोरोनासंदर्भात घेणार आढावा

सामान्यांचा ट्रेन प्रवास बंद होण्याची शक्यता – महापौर

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी राज्यात ४३ हजार १८३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर मुंबईत ८ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणरा का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संध्याकाळी ४.३० वाजता आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्य सचिव, आरोग्य मंत्री तसेच सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कोरोनाबाबत काय निर्णय होणार किंवा राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत काही निर्णय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना उपाययोजानंसंदर्भात सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही बैठक आहे. कोरोना पुन्हा रुग्ण वाढत असल्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील याबाबतही चर्चा होणार आहे. नव्या नियमांची अंमलबजावणी कशी करायची याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली आहे.

सामान्यांचा ट्रेन प्रवास बंद होण्याची शक्यता – महापौर

- Advertisement -

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. मुंबईची वाटचाल पुन्हा डेंजर झोनकडे होत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. सामान्य प्रवाशांना ट्रेन प्रवास करणे बंद करण्यात येईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली होती.

वाढत्या गर्दीला आणि कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. हॉटेलमध्ये ५० टक्के उपस्थितीची कडक अंमलबजावणी केली जाईल. तसेच, वयोवृद्ध आणि लहान मुले यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी धार्मिक स्थळे बंद केली जातील. त्याचप्रमाणे गर्दीची ठिकाणे असलेले थिएटर, मॉल हेसुद्धा बंद केले जातील. ट्रेनमध्ये सामान्य प्रवाशांना प्रवास बंदी करण्यात येईल. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाच प्रवास करण्यास परवानगी असेल. खासगी कार्यालयात दोन शिफ्टमध्ये आणि ५० टक्के उपस्थितीत काम करणे बंधनकारक केले जाऊ शकते. दुकानात होणारी गर्दी रोखण्यासाठी दुकाने एक दिवस आड उघडण्यात येतील, असे महापौरांनी सांगितले.

- Advertisement -

पुण्यातील लॉकडाऊनबाबत अजित पवार घेणार निर्णय

पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि प्रतिबंधक उपाययोजनांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील कौन्सिल हॉल येथे (शुक्रवार, 2 एप्रिल 2021) सुरू आहे. बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. पुण्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कोरोनाचा आढावा घेण्यात येत आहे. लॉकडाऊन होणार की नाही याबाबत मोठा निर्णय होईल.

- Advertisement -