घरमहाराष्ट्रअंगणवाडी सेविकांना मिळणार मानधनाच्या अर्धे पेंशन

अंगणवाडी सेविकांना मिळणार मानधनाच्या अर्धे पेंशन

Subscribe

म्हातारपणी औषधोपचाराचा खर्च तसेच उदरनिर्वाहासाठी पेंशन आवश्यक असल्याने त्यांना मानधनाच्या पन्नास टक्के पेंशन देण्यात येणार आहे.

राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनाच्या पन्नास टक्के रक्कम सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेंशन म्हणून देण्यास सरकार सकारात्मक असल्याचे महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र सरकारने जाहीर केलेली मानधन वाढ अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना आपण भेटणार असल्याचे त्या म्हणाल्या. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्ट मंडळासोबत मंत्रालयीन दालनात झालेल्या बैठकीत पंकजा मुंडे बोलत होत्या.

काय म्हणाल्यात पंकजा मुंडे –

बहुसंख्य अंगणवाडी सेविका, मदतनीस या अल्प उत्पन्न गटातील कर्मचारी आहेत. मानधन हे कुटुंबासाठी खर्च होत असल्याने भविष्यासाठी त्या बचत करू शकत नाही. त्यामुळे म्हातारपणी औषधोपचाराचा खर्च तसेच उदरनिर्वाहासाठी पेंशन आवश्यक असल्याने त्यांना मानधनाच्या पन्नास टक्के पेंशन देण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या समस्या आणि मागण्यांबाबत शासन नेहमी सकारात्मक होते आणि यापुढेही सकारात्मक रहाणार असल्याचे सांगुन माझ्या कार्यकाळात अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना दोन वेळा ऐतिहासिक मानधनवाढ देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही केल्याचे त्या म्हणाल्यात. केंद्र शासनाने सप्टेंबर २०१८ मध्ये सेविकांना एक हजार ५०० रूपये, मदतनीसांना ७५० रूपये आणि मिनी अंगणवाडी सेविकांना १२५० रूपये मानधन वाढ जाहीर केली होती व ती वाढ १ ऑक्टोबर २०१८ पासून देण्याचे मान्य केले होते, ही वाढ त्यांना मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून वाढीव मानधन लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -