घरमुंबईआता डोंबिवलीकरांचे प्रश्न सुटणार!

आता डोंबिवलीकरांचे प्रश्न सुटणार!

Subscribe

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आता डोंबिवली विभागीय कार्यालयात पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केडीएमसीतील एका अधिकाऱ्याने आठवडयातून एक दिवस  डोंबिवली विभागीय कार्यालयात उपस्थित राहावे, असे आदेश महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले आहेत. यापूर्वीही अनेकवेळा, असे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजाणवी काही दिवसांपूरतीच झाली. त्यामुळे आताच्या अधिकाऱ्यांची उपस्थितीत किती दिवस सातत्य राहते हेच पाहावे लागणार आहे.

अधिकाऱ्यांच्या मागणीला आयुक्तांची परवानगी

कल्याणात पत्रीपूलाचे काम सुरू आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागतो. कल्याणामध्ये महापालिकेचे मुख्यालय असल्याने त्याठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे डोंबिवलीतील नागरिकांना विविध कामांसाठी कल्याणामध्ये धाव घ्यावी लागते. रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे  महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी डोंबिवली विभागीय कार्यालयात आयुक्तांनी स्वत: आपल्या अधिपत्याखालील जबाबदार अधिकाऱ्याने आठवडयातून एक दिवस उपस्थित राहावे अशी मागणी आयुक्तांकडे केली हेाती. त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे. मात्र  महापालिकेचा अधिकारी कोणत्या दिवशी उपस्थित राहील ते जाहिर करण्यात यावे अशीही मागणी भोईर यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कल्याण स्थानकातील स्वच्छतेवर मुंबईहून कंट्रोल


शासकीय यंत्रणेचा अधिकारी हवाय

कल्याण हे तालुक्याचे ठिकाण असल्याने कल्याण पश्चिमेत महापालिका मुख्यालयासह महावितरण तेजश्री कार्यालय, कल्याण न्यायालय डीसीपी कार्यालय सार्वजनिक बांधकाम मुख्य पोस्ट कार्यालय, आयकर कार्यालय पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण कार्यालय, तहसीलदार, भूमी अभिलेख, आरटीओ, एपीएमसी अशी प्रमुख शासकीय कार्यालये तसेच फूल मार्केट आणि दैनंदिन गरजांची मुख्य बाजारपेठ आहे. या शासकीय कार्यालयात जाण्यासाठी पत्रीपूलावरूनच जावे लागते. या मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक वेळेत पोहोचत नाहीत. तसेच वेळ पैसा नाहक वाया जातो. त्यामुळे महत्वाच्या शासकीय कार्यालयातील अधिकारी यांना एक दिवस डोंबिवलीत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणीही भेाईर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

- Advertisement -

हेही वाचा – डोंबिवलीत तिरडीच्या चटईत गोलमाल?; मनसेकडून प्रकार चव्हाट्यावर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -