घरमहाराष्ट्रAnil Deshmukh Case: अहवालात छेडछाड केल्याप्रकरणी तिवारी आणि आनंद डागा यांना दोन...

Anil Deshmukh Case: अहवालात छेडछाड केल्याप्रकरणी तिवारी आणि आनंद डागा यांना दोन दिवसांची CBI कोठडी

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणी सीबीआय तपासाच्या प्राथमिक अहवालात छेडछाड केल्याप्रकरणी पोलीस अधिकारी अभिषेक तिवारी आणि देशमुख यांचे वकील आनंद डागा ((Anil Deshmukh’s lawyer Anand Daga) यांना दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयने यांना आज सत्र न्यायालयात हजर केलं होतं. दरम्यान, या दोघांनाही दिल्लीला घेऊन जाणार आहेत.

अनिल देशमुख यांच्या सीबीआय प्रकरणामध्ये बुधवारी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केली आहे. अनिल देशमुख प्रकरणातील प्राथमिक अहवालात सीबीआयच्या अधिकाऱ्यामार्फत फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

आनंद डागा यांनी १५ दिवसांच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल बनवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या टीममधील पोलीस उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना लाच देऊन अहवालात फेरफार करण्यास सांगितलं. अनिल देशमुख यांना क्लीनचीट दिल्याचा अहवाल २९ ऑगस्टला समोर आला होता. या अहवालात अनिल देशमुख यांनी कुठलाही दखलपात्र गुन्हा केलेला नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर सीबीआयने यात फेरफार केला गेला असल्याचं सांगत या प्रकरणाची चौकशी सुरु केली होती.

देशमुख यांच्या जावयाला सीबीआयनं सोडलं

अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांनाही काल रात्री सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. वरळी इथल्या सुखदा इमारतीमध्ये गौरव चतुर्वेदी आले होते. त्याचवेळी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतलं. मात्र, देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी यांची भूमिका स्पष्ट झाली नाही म्हणून त्यांना सोडून देण्यात आलं.

- Advertisement -

हेही वाचा – CBI ने आपल्याच अधिकाऱ्याला केली अटक, रिपोर्टमध्ये छेडछाड केल्याचा आरोप

अनिल देशमुखांना धक्का, वकिलाला CBI कडून अटक, अहवालात अधिकाऱ्यामार्फत फेरफार केल्याचा आरोप


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -