घरताज्या घडामोडीMoney laundering case: अनिल देशमुखांच्या कोठडीला न्यायालयात विरोध करणार, वकील इंद्रपाल सिंह...

Money laundering case: अनिल देशमुखांच्या कोठडीला न्यायालयात विरोध करणार, वकील इंद्रपाल सिंह यांचे वक्तव्य

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी साडेचार कोटी रुपयांच्या प्रकरणासाठी सहकार्य केले होते. ईडीच्या चौकशीदरम्यानही त्यांनी सहकार्य केले परंतु त्यांना १०० कोटींच्या प्रकरणात अटक करण्यात आली असल्यामुळे सेशन कोर्टात हजर केल्यावर कोठडीला विरोध करणार, असे वक्तव्य अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी केलं आहे. सोमवारी अनिल देशमुख स्वतःहून ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहिले होते. १३ तासाच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांना रात्री उशीरा ईडीने अटक केली आहे. देशमुखांना सकाळी ११ वाजताच्या सुमारास सेशन कोर्टात हजर करण्यात येईल.

कोरोना काळात १०० कोटी रुपये खंडणी गोळा करण्याचे आदेश तत्कालीन राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले असल्याचा आरोप माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. या आरोपांची ईडीकडे चौकशी सुरु आहे. ईडीने देशमुखांना ५ वेळा समन्स बजावला होता. पंरतु देशमुख हजर झाले नाही. आता देशमुख स्वतःहून चौकशीला सामोरे गेले आणि त्यांना ईडीने अटक केली आहे. देशमुख फक्त साडेचार कोटी रुपयांच्या चौकशीसाठी गेले होते परंतु त्यांना १०० कोटी रुपयांच्या प्रकरणात अटक केली असल्याची माहिती अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी दिली आहे.

- Advertisement -

ईडी अनिल देशमुख यांना मंगळवार २ नोव्हेंबर २०२१ रोजी सेशन कोर्टात हजर करणार आहे. कोर्टात ईडी देशमुखांची ६ ते ७ दिवस रिमांड, ईडी कोठडीची मागणी करु शकते. यावेळी आपण अनिल देशमुखांच्या कोठडीसाठी विरोध करणार असल्याचे इंद्रपाल सिंह यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी वकील इंद्रपाल सिंह आणि काही सहकाऱ्यांसोबत ईडीच्या कार्यालयात ११.४० वाजता हजर झाले होते. यानंतर थोड्य़ा वेळाने त्यांना ब्रेक देण्यात आला नंतर चौकशीला सुरुवात केली असल्याची माहिती मिळाली आहे.

देशमुखांची मागील आठवड्यात हायकोर्टाने ईडीचे समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली होती. कोर्टात सुनावणी सुरु असल्यामुळे देशमुखांनी ईडीच्या ५ समन्सला प्रत्यक्षात हजेरी नव्हती लावली. अखेर ते ईडीच्या चौकशीला सामोरे गेले. चौकशीदरम्यान देशमुख सहकार्य करत नव्हते असे ईडीकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा :  देशमुखांनी ईडीला पुरावे गोळा करण्यासाठी पुरेसा वेळ दिल्याने अटक, चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -