घरमहाराष्ट्रST workers strike : पडळकर, खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी घेणार का?...

ST workers strike : पडळकर, खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी घेणार का? अनिल परब यांचा सवाल

Subscribe

एसटी महामंडळाचा राज्य सरकारमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. ठिकठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला आता भाजपा, मनसे आणि इतर विरोधी पक्षांकडून पाठींबा दिला जात आहे. याचपार्श्वभूमीवर आज मंत्रालयावर एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा धडकला आहे. मात्र पोलिसांकडून या आंदोकल एसटी कामगारांना ठिकठिकाणी अडवले जात आहे. तर आंदोलनात सहभागी भाजपा नेत्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा सुरु असताना राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावरून भाजपा नेत्यांवर टीका केली आहे. पडळकर, खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी घेणार का? असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी या नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन केले आहे. परिवहन मंत्री अनिल परब आज माध्यमांशी बोलत होते.

”भाजपाचे दोन-चार नेते कामगारांची माथी भडवकतात”

यावेळी बोलताना परब म्हणाले की, “भाजपाचे दोन-चार नेते पुढाकार घेऊन कामगारांची माथी भडवकत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांनी या भूलथापांना बळी पडू नये. एसटीचे कर्मचाऱ्यांना वारंवार आवाहन करुनही कर्मचारी संपावर ठाम आहेत. उच्च न्यायालयाने दिलेले आदेश कर्मचाऱ्यांचे हित आणि राज्य शासनामध्ये विलनीकरणाची मागणी बघून दिला आहे. एसटी महामंडळात विलनीकरणाची मागणी १ ते २ दिवसांत पूर्ण होणारी नाही त्यामुळे उच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे. त्या समितीमध्ये तीन उच्च स्तरीय सरकारी अधिकारी आहेत. त्यांच्यासमोर आपली बाजू मांडून समितीने १२ आठवड्यांमध्ये अहवाल द्यावा अशाप्रकारचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. हा आदेश एसटी महामंडळाला लागू होतो तसा एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू होतो. आम्ही आदेशाती पूर्तता करुन जीआर काढला, बैठक घेत पालन केले.”

- Advertisement -

“हा संप हायकोर्टाने बेकायदा ठरवला”

भडवणाऱ्यांच्या भडकवण्याला बळी पडू नका कारण नुकसान भडकवणाऱ्या नेत्याचे होत नाही नुकसान सर्वसामान्य कामगाराचे होते. काल अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली, कारवाई करावी अशी आमची इच्छा नाही. परंतु सरकार म्हणून आम्ही लोकांनाही तेवढेच जबाबदार आहोत. सर्व कामगारांना दिवाळीनंतर सर्व मागण्या पूर्ण करु असे लेखी आश्वासन दिले असतानाही कामगारांनी काही संघटनांच्या नेत्यांच्या भाषणाला, भडकवण्याला बळी पडून संप केलेला आहे. हा संप हायकोर्टाने बेकायदा ठरवला आहे. असंही अनिल परब यांनी सांगितले.

पडळकर, खोत कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदार घेतायत का?

“रस्त्यावर उतरलेल्या कामगारांना विनंती आहे की, राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेत आहे. त्यामुळे या कामगारांचे नुकसान झाले तर त्याला गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत जबाबदार असतील. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदार घेतायत का? हे पण त्यांनी सांगावे.” असा सवालही अनिल परब यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

“कामावर न आलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार कापले जाईल”

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कामावर न आलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार कापला जाईल, त्याची जबाबदारी हे नेते घेणार आहेत का? कामगारांच्या सर्व मागण्यापूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत मात्र कामगार सर्व गोष्टी स्वत: च्या ताब्यात घेणार असतील तर ही गोष्ट दुर्दैवी आहे. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये विलीन करण्याची मागणी कर्मचाऱ्यांच्यावतीने राजकीय पक्षांनी लावून ठरली आहे. असंही अनिल परब यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांविरोधातील अवमान याचिकेवर पुन्हा सोमवारी सुनावणी

आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात एसटी महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयत अवमान याचिका दाखल केली. कोर्टाचा अवमान करणाऱ्या आंदोलक कामगारांना नोटीस जारी करण्याची विनंती केली आहे. संप न करण्याचे हायकोर्टाचे आदेषश असूनही कामगार संपावर ठाम असल्याची माहिती महामंडळाने हायकोर्टात दिली. याची दखल घेत शुक्रवार पर्यंत सर्व एसटी कामगर संघटनांनी अवमान याचिकेवर उत्तर देण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहेत. यानंतरची सुनावणी आता सोमवारी नियमित कोर्टापुढे होणार आहे. मात्र कनिष्ठ वेतनश्रेणी कामगारांच्यावतीनं ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी या अवमान याचिकेला विरोध करत ही याचिका दाखल होण्यायोग्य नसल्याचे मत कोर्टासमोर सादर केले आहे. न्यायमूर्ती एस. काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या सुट्टीकालीन कोर्टापुढे ही सुनावणी पार पडली.

सोमय्या, पडळकरांनी पोलिसांनी घेतले ताब्यात

दरम्याम आज राज्यभरातील एसटी कर्मचारीआंदोलनासाठी मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेने रवाना होत आहे. मात्र ठिकठिकाणी या कर्मचाऱ्यांना अडवले जात आहे. अशातच मुंबईत मंत्रालयाबाहेर भाजपाचे नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन सुरु होते. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे मरीन ड्राईव्ह पोलिसांनी पडळकर, सोमय्यांना ताब्यात घेतलं आहे.


 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -