घरताज्या घडामोडीपर्यटनाच्या योजनेला चालना मिळण्यासाठी रत्नागिरी विमानतळाचं विस्तारीकरण गरजेचं - अनिल परब

पर्यटनाच्या योजनेला चालना मिळण्यासाठी रत्नागिरी विमानतळाचं विस्तारीकरण गरजेचं – अनिल परब

Subscribe

पर्यटनाच्या योजनेला चालना मिळण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली. दरम्यान, पर्यटनाच्या योजनेला चालना मिळण्यासाठी रत्नागिरी विमानतळाचं विस्तारीकरण करणं गरजेचं असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

विमानतळाच्या जागेबाबत प्रस्ताव शासनाकडे

अनिल परब यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये रत्नागिरी विमानतळाच्या जागेबाबत लांबी वाढवण्याचा प्रस्ताव शासनाकडे आहे. त्याबाबतीत अर्थसंकल्पामध्ये तरतूद व्हावी, अशा प्रकारची मागणी करण्यात आली असं अनिल परब यांनी सांगितलं.

- Advertisement -

रत्नागिरी विमानतळाचं विस्तारीकरण गरजेचं

यासंदर्भात विस्तृत चर्चा करून अॅक्युशेसन करायचं आहे. तसेच ते करण्यासाठी पैशांची व्यवस्था व्हावी, यासाठी मागणी करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने जगाच्या पाठीवर एक वेगळं स्थान आहे. शासनाकडून सिंधू रत्न योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत रत्नागिरी पर्यटनाच्या योजनेला चालना मिळण्यासाठी जे विविध उपक्रम आपण करत आहोत. त्या उपक्रमांना आणखीन साथ मिळण्यासाठी रत्नागिरी विमानतळाचं विस्तारीकरण होणं हे फार गरजेचं आहे, असं परब म्हणाले.

ज्याप्रमाणे चिपी विमानतळाचा प्रवास वाढत चालला आहे. तसेच त्याचं विस्तारीकरणं होत आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी विमानतळाचं होईल. त्यामुळे एक चांगलं पर्यटन स्थळ देशातील नागरिकांना खुलं होईल, म्हणून रस्ता विस्तार योजने संदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी सर्व विषय समजून घेतले असून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

सहा महिन्यांमध्ये विस्तारीकरणाचा आराखडा तयार होईल

विस्तारीकरण करण्यासाठी अॅक्युशेसन करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. निधीची मागणी उद्याच्या बजेटमध्ये झाल्यानंतर जवळपास पुढील सहा महिन्यांमध्ये याबाबतीत विस्तारीकरणाचा आराखडा तयार होईल. तसेच त्यावर कामं केलं जाईल, असं परब म्हणाले.


हेही वाचा : Meta Shares Sink: फेसबुकला मोठा झटका ! शेअर्स अन् युझर्सच्या संख्येतही घट


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -