Barasu Refinery: कोकणची लेक अंकिता प्रभू झाली ट्रोल; नेमकं प्रकरण काय?

ताईने सुंदर कोकण दाखवून आणि मालवणी भाषा बोलून युट्यूबवर पैसे कमावले.. आणि आता ताई कोकणात रिफायनरीला समर्थन देत आहे, असं कसं चालेल ताई?

Ankita Pramod Prabhu Walawalkar Kokan hearted girl got trolled on Barsu Refineries Viral poster
Ankita Pramod Prabhu Walawalkar Kokan hearted girl got trolled on Barsu Refineries Viral poster

अंकिता वालावलकर ही एक सोशल मीडिया कंटेट क्रिएटर आहे. सोशल मीडियावर ती कोकण हार्टेर्ड गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे. अंकिता मुख्यत्वे कोकणातील प्रसिद्ध पर्यटन आणि खाद्य संस्कृतीवर व्हिडीओज करत असते. आता तिने कोकणात होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे. ( Ankita Pramod Prabhu Walawalkar Kokan hearted girl got trolled on Barsu Refineries Viral poster  )

आता कोकण हार्टेड गर्ल हीने रिफायनरी प्रकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर ही सोशल मीडियावरील खूपच लोकप्रिय चेहरा आहे. परंतु तिने रिफायनरीच्या ज्वलंत मुद्यावर काही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे आता तिला ट्रोल केलं जात आहे. ताई कोकण भडकतंय आता कधी बोलणार असा सवालही नेटकरी तिला करत आहेत. त्यानंतर अंकिताने तिच्या युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडिओत तिने मुंबईच्या रिफायनरीचा आढावा घेतला आणि तिच्या व्हिडिओमध्ये या रिफायनरी कशा काम करतात याबद्दल सविस्तर माहितीही दिली आहे. परंतु काहींना तिचं मतं पटलेलं नाही, त्यामुळे तिला खूप ट्रोल केलं जात आहे. त्यातच आता एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अंकिता प्रभू वालावालकर म्हणजेच कोकण हार्टेर्ड गर्ल हिच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली जात आहे.

हा फोटो पोस्टर बॉयने त्याच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात त्याने लिहिलंय की ताईने सुंदर कोकण दाखवून आणि मालवणी भाषा बोलून युट्यूबवर पैसे कमावले.. आणि आता ताई कोकणात रिफायनरीला समर्थन देत आहे, असं कसं चालेल ताई? हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा सोशल मीडियावर रिफायनरीच्या मुद्दयावर नवे विवाद सुरु झाले आहेत.

( हेही वाचा: एकदा हा चित्रपट सेंट्रल बोर्ड… शबाना आझमी यांनी केलं ‘द केरळ स्टोरी’चे समर्थन )

ग्रामस्थांचा रिफायनरीला विरोध का?

बारसू वासियांना या प्रकल्पासाठी आपल्या जागा द्यायच्या नाहीत. आमच्या येथील आंबा, मच्छी व्यवसाय, शेती हे सगळेच या प्रकल्पामुळे नष्ट होईल. हा प्रकल्प प्रदूषण करणारा आहे. त्यामुळे कोकणतील निसर्गाला, जैवविविधतेला, पर्यावरणाला या प्रकल्पाने बाधा पोहोचेल. त्यामुळे आमचा पारंपारिक शेती व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, आंबा काजूच्या बागा नष्ट होतील, अशी भीती व्यक्त करत येथील ग्रामस्थांनी नियोजित प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवला आहे.