घरमहाराष्ट्रनाशिकएकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी केले शरद पवारांच्या नेतृत्वाचे कौतूक; म्हणाले...

एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी केले शरद पवारांच्या नेतृत्वाचे कौतूक; म्हणाले…

Subscribe

शरद पवार यांच्या नेतृत्वाबद्दल मंत्री दादा भुसे म्हणाले, पवार साहेबांनी पक्षात नेतृत्व तयार होऊ दिले नाही, असं म्हणणं व्यक्तीगत पातळीवर उचित वाटत नाही.

नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) शरद पवार यांच्या नेतृत्वात नवीन नेतृत्व तयार होऊ दिले जात नाही, हे साफ खोटं आहे, असं म्हटलं आहे शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादा भुसे यांनी. पवारांच्या नेतृत्वात तयार झालेल्या नेत्यांची यादीच दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितली. दैनिक सामनामधील अग्रलेखात राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवढा मी मोठा नाही, मात्र शरद पवार यांनी राज्यात अजित पवारांपासून नरहरी झिरवाळ यांच्यापर्यंत अनेक नेते उभे केले असल्याचं म्हणत दादा भुसे यांनी शरद पवारांचे कौतुक केले आहे.

मंत्री दादा भुसेंकडून शरद पवारांचे कौतुक  
राज्यात सध्या राजकीय वाद – विवाद हा चर्चेचा विषय आहे. एकही नेता दुसऱ्या नेत्याबद्दल बरं बोलताना दिसत नाही. मात्र नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते तथा राज्याचे बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांनी राष्ट्रवादीमधील अध्यक्षपदाचा वाद हा त्यांचा अंतर्गत वाद असल्याचं म्हणत शरद पवार यांच्या नेतृत्वाचं देखील कौतूक केलं.

- Advertisement -

अजित पवार (Ajit Pawar) आणि अनेक नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वातच तयार झाले आहेत, असे सांगत दादा भुसे यांनी बाजूलाच बसलेले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narahari Jirwal) यांच्याकडे इशारा करत झिरवाळ यांचे नेतृत्व देखील शरद पवार यांच्याच मार्गदर्शनात तयार झाल्याचे सांगितले.

दैनिक ‘सामना’च्या (Daily Saamana) आजच्या (सोमवार) अग्रलेखात शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही, अशी टीका करण्यात आली आहे. त्याबबद्दल दादा भुसे यांना नाशिकमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मंत्री भुसे म्हणाले, या प्रश्नावर माझ्या सारख्या कार्यकर्त्याने बोलणे उचित होणार नाही.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ‘सामना’चे संपादक खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचा नामोल्लेख टाळून मंत्री दादा भुसे म्हणाले, कधी कधी नाव कोणाचं असतं आणि लिहितयं कोण हेच माहित नसतं. अग्रलेख लिहिणाऱ्यांनीच त्याचे उत्तर द्यावे, असे म्हणत शिवसेनेला (ठाकरे गट) टोला लगावला.

- Advertisement -

शरद पवार यांच्या नेतृत्वाबद्दल मंत्री दादा भुसे म्हणाले, पवार साहेबांनी पक्षात नेतृत्व तयार होऊ दिले नाही, असं म्हणणं व्यक्तीगत पातळीवर उचित वाटत नाही. अजित पवार असतील नाही तर राष्ट्रावादीतील इतर नेते हे पवारांच्याच नेतृत्वात तयार झाले आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ देखील शरद पवार यांनीच निर्माण केलेले नेतृत्व आहे.

सामनामधील अग्रलेखात म्हटले आहे की, राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये जाण्यास तयार होते, यावर उत्तर देण्याचे मंत्री दादा भुसे यांनी टाळले. आजचा सामना मी वाचलेला नाही, असं ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -