मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; अनेक दिग्गज नगरसेवकांना धक्का

आज 236 प्रभागांपैकी 118 महिला प्रभाग झाले आहेत. तर उर्वरित 118 प्रभागात पुरुष उमेदवारांना निवडणूक वाढविता येणार आहे. पालिकेच्या इतिहासात मागील काही वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला व पुरुष उमेदवार यांना समसमान संधी उपलब्ध झाली आहे.

मुंबईः राज्य निवडणूक आयोगानं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर केलीय. विशेष म्हणजे या आरक्षण सोडतीत अनेक दिग्गज पुरुष नगरसेवकांचे वॉर्ड महिलांसाठी राखीव झालेत, त्यामुळे अनेक नगरसेवकांना निवडणुकीसाठी आता दुसरा वॉर्ड शोधावा लागणार आहे. अनुसूचित जातीतील महिलांसाठी 85, 107, 139, 190, 194, 165, 119, 204 हे प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. या वॉर्डातील विद्यमान पुरुष नगरसेवकांना दुसरा वॉर्डाचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे. 60, 85, 107, 119, 190, 194, 204, 208, 215, 221, 139, 153, 157, 162, 165 हे प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेच्या सन 2022 च्या निवडणुकीसाठी मंगळवारी वांद्रे रंगशारदा येथे पालिका आयुक्त इक्बाल चहल, निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत नवीन प्रभाग रचनेनुसार 236 प्रभागातून महिलांसाठी 50 टक्के प्रभाग म्हणजे 118 प्रभाग, अनुसूचित जातीसाठी 15 प्रभाग, अनुसूचित जमातीसाठी 2 प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत. आरक्षित प्रभाग जाहीर झाल्याने अनेक माजी नगरसेवकांना आपला प्रभाग सुरक्षित झाल्याने माजी किशोरी पेडणेकर यांना प्रभाग खुला झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

तर प्रभाग महिला, अनुसूचित जाती, अनुसुचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने अनेक माजी नगरसेवकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये पालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा, शिवसेनेचे अनिल कोकीळ, विश्वनाथ महाडेश्वर, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, अमेय घोले, कमलेश यादव, अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी, समाजवादी पक्षाचे गटनेते व माजी नगरसेवक रईस शेख ( मात्र रईस शेख हे सध्या आमदार आहेत.) आदी माजी नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे आता ज्या ज्या माजी नगरसेवकांना या आरक्षित प्रभागांचा फटका बसला आहे, त्यांना आपल्या आजूबाजूच्या किंवा थोड्या दूरच्या पण सोयीच्या प्रभागात उडी मारून निवडणूक लढावी लागणार आहे.

आज 236 प्रभागांपैकी 118 महिला प्रभाग झाले आहेत. तर उर्वरित 118 प्रभागात पुरुष उमेदवारांना निवडणूक वाढविता येणार आहे. पालिकेच्या इतिहासात मागील काही वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला व पुरुष उमेदवार यांना समसमान संधी उपलब्ध झाली आहे. तसेच महिलांसाठी आरक्षित झालेल्या 118 प्रभागात अनुसूचित जाती महिलांसाठी – 8, अनुसूचित जमाती महिलांसाठी 1 अशा 9 प्रभागांची सोडत लॉटरी पद्धतीने काढण्यात आली. तसेच महिलांसाठी 118 प्रभाग आरक्षित करताना उर्वरित 109 प्रभागांपैकी 86 प्रभाग चक्रआकार पद्धतीने अगोदरच आरक्षित करण्यात आल्या आहेत. तर उर्वरित 23 महिला प्रभाग आरक्षित करण्यासाठी लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आली. लॉटरी पद्धतीने एकूण 32 प्रभागांची सोडत काढण्यात आली.

236 प्रभागांचे आरक्षण खालीलप्रमाणे

60,85,107,119,139,253,157,162,165,190,194,204,208,215 व 221 हे 15 प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती महिला प्रभाग आरक्षित करण्यासाठी लॉटरीद्वारे सोडत काढण्यात आली. त्यात, अनुसूचित महिलासाठी -: 139, 190, 194, 165, 85, 107, 119, 204 हे प्रभाग लॉटरी सोडतीद्वारे आरक्षित करण्यात आले आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 55 – 124 या प्रभागातून लॉटरी सोडतीद्वारे 124 हा प्रभाग अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित करण्यात आला आहे.

त्यानंतर 118 महिला प्रभागांपैकी सर्वसाधारण महिलांसाठी 109 प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. निवडणूक विभागाने चक्राकार पद्धत या गुणसूत्राचा वापर करून 86 प्रभाग अगोदरच राखीव होत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर उर्वरित 23 प्रभागांसाठी आरक्षण सोडत लॉटरी पद्धतीने काढण्यात आली. त्यानुसार, प्रभाग क्रमांक 11, 44, 50, 75, 79, 102, 154, 155, 160, 81, 88, 99, 137, 217, 146, 188, 148, 96, 9, 185, 130, 232, 53 हे प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले.