घरक्राइममालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात २४ व्या साक्षीदारानेही साक्ष फिरवली

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात २४ व्या साक्षीदारानेही साक्ष फिरवली

Subscribe

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात ही सुनावणी पार पडली. या प्रकरणातील ११ वा आरोपी सुधाकर चतुर्वेदी याचा हा साक्षीदार होता.

मुंबई – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील (Malegaon blast 2008) आणखी एका साक्षीदाराने साक्ष फिरवली आहे. २३ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत या प्रकरणातील २४ व्या साक्षीदारालाही न्यायालायने फितूर म्हणून घोषित केले. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात ही सुनावणी पार पडली. या प्रकरणातील ११ वा आरोपी सुधाकर चतुर्वेदी याचा हा साक्षीदार होता. (Another witness turned hostile before Special NIA Court in the 2008 Malegaon blast case)

“सुधारकर चुतर्वेदी हे माझ्या घरी भाडेकरू म्हणून राहत होते. तेवढीच त्यांची आणि माझी ओळख आहे. या खटल्याशी संबंधित इतर कोणतीही माहिती आणि कुठलीही ओळख माझ्याकडे नाही”, असं न्यायालयासमोर या साक्षीदाराने सांगितले. त्यामुळे मुंबई सत्र न्यायालायच्या विशेष एनआयए न्यायालयाने त्याला फितूर म्हणून घोषित केले.

- Advertisement -

हेही वाचा – लाईफलाईन हॉस्पिटल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सुजित पाटकरांविरोधात गुन्हा दाखल

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावात भयंकर बॉम्बस्फोट घडला होता. या बॉम्बस्फोटाने हिंदू दहशतवाद जन्माला घातला असं म्हटलं जातंय. २००८ पासून याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. गेल्या 11 वर्षांपासून एनआयए याप्रकरणी तपास करत असून आतापर्यंत २३ जणांनी या खटल्यात साक्ष फिरवली आहे. त्यामुळे याप्रकरणी निकाल कधी लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

कर्नल पुरोहितांच्या साक्षीदाराने फिरवला होता जबाब

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एटीएसने अभिनव भारत ट्रस्ट विरोधातही चार्जशीट दाखल केलं होतं. हा ट्रस्ट लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप आहे. स्फोटाशी या ट्रस्टचा संबंध असल्याबाबत एका साक्षीदाराने जबाब दिला होता. मात्र, २५ जुलै रोजी कोर्टात झालेल्या सुनावणीत साक्षीदाराने साक्ष फिरवली. आपण पुरोहितांना ओळखतो, मात्र एटीएसच्या चार्जशीटमध्येजो उल्लेख आहे, तो जबाब आपला नसल्याचे या साक्षीदाराने कोर्टात सांगितले.

हेही वाचा – डॉ. आशा गोयल खून खटल्यात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

काय आहे प्रकरण?

मालेगावमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर एका मशिदीत मोटारसायकलवर २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. सुरुवातीला हे प्रकरण एटीएसकडे होते. मात्र, २०११ मध्ये एनआयएकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलं. तेव्हापासून एनआयएच्या विशेष न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी या प्रकरणी आरोपी असल्याचं एनआयएने म्हटलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -