घरमहाराष्ट्रचित्रा वाघ यांच्या पतीविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल

चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल

Subscribe

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. मात्र, संजय राठोड यांच्याविरोधातील याच आक्रमकपणामुळे चित्रा वाघ यांच्यासमोर अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. कारण बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आता पोलीसही तपास करत आहेत.

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना 2016 मध्ये 4 लाखांची लाच मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. याच तपासादरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता गुन्हा दाखल केला आहे. परळच्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित हे प्रकरण असून किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी त्यांच्या पतीची चौकशी होणार होती. या चौकशीच्या फेर्‍यापासून वाचण्यासाठी पती चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता, अशी चर्चा होती. परंतु हे प्रकरण आता पुन्हा उफाळून आले आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विविध शहरात असलेल्या मालमत्तांपैकी 90 टक्के मालमत्ता ही बेहिशेबी मालमत्ता असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे एक कोटींहून अधिकची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा दावा केला जात आहे.

- Advertisement -

राजकीय सुडबुद्धीने कारवाई- चित्र वाघ
या कारवाईवरून भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. पतीविरोधात एफआयआर दाखल झाल्याचे कळवण्यात आले नाही, असे वाघ म्हणाल्या.

भाजपमध्ये प्रवेश केला नसता तर गुन्हा दाखल झाला असता
किशोर वाघांवर आज नाही तर 15 दिवस अगोदर 12 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला आहे. खुली चौकशी 2016 ला भाजपाने सुरू केली. ताईंनी भाजपात प्रवेश केला नसता तर फडणवीस सरकारने तेव्हाच गुन्हा दाखल केला असता. भाजपा सरकारच्या राजकीय दिरंगाई व कोरोनामुळे वेळ लागला. किशोर वाघांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचे दिसत आहे, असे सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या ट्विट सोबत एफआयआर कॉपी देखील जोडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -