घरताज्या घडामोडीमराठा आरक्षणाचे आंदोलन कोणाच्या विरोधात हे संभाजीराजेंनी स्पष्ट करावे, अरविंद सावंताचा सवाल

मराठा आरक्षणाचे आंदोलन कोणाच्या विरोधात हे संभाजीराजेंनी स्पष्ट करावे, अरविंद सावंताचा सवाल

Subscribe

संभाजीराजेंबद्दल मनात आदर आहे आणि तो सर्वांच्याच मनात आहे. ते उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे करत नाहीत.

मराठा आरणक्षणाच्या न्यायहक्कासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा मोर्चाची हाक दिली आहे. १६ जूनला पहिला मोर्चा कोल्हापुरमधून निघणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. परंतु शिवेसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी संभाजीराजेंना सवाल केला आहे. संभाजीराजे छत्रपती यांचे आंदोलन कोणाविरोधात आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात आहे का? केंद्र सरकारच्या विरोधात आहे का? की राज्य सरकारच्या विरोधात आहे? हे त्यांनी स्पष्ट करावे असा सवाल अरविंद सावंत यांनी केला आहे. तर संभाजीराजेंच्या घोषणेचे भाजपकडून स्वागत करण्यात आले असून आंदोलनाला पाठिंबाही दिला आहे.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. मराठा आरक्षण न्यायिक लढाई आहे हे विसरता कामा नये, कोणासाठी लढतोय? कशासाठी लढतोय? आणि कोणाच्या विरोधात लढतोय? एवढे लक्षात घेतलं पाहिजे. जिथे राज्य सरकार तुमच्यासोबत आहे त्यांच्याविरोधात मोर्चा काढून काय होणार आहे. जर आता आंदोलन किंवा मोर्चा असेल त्याचा अर्थ असा आहे की ते सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आहेत. परंतु राज्य सरकार हा लढा उत्तम लढत असून राज्य सरकारने तशी पाऊले उचलली आहेत असे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

दरम्यान पुढे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे की, संभाजीराजेंबद्दल मनात आदर आहे आणि तो सर्वांच्याच मनात आहे. ते उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे करत नाहीत. फक्त हे आंदोलन कोणाच्या विरोधात आहे. हे त्यांनी सांगितले पाहिजे. संभाजीराजे छत्रपती यांचे आंदोलन कोणाविरोधात आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात आहे का? केंद्र सरकारच्या विरोधात आहे का? की राज्य सरकारच्या विरोधात आहे? असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

आंदोलनाला भाजपचा पाठिंबा

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणावरुन अल्टिमेटम दिलं होते. परंतु राज्य सरकारने काही केलं नाही. त्यामुळे १६ जूनपासून कोल्हापुरातून मोर्चा काढण्यास सुरुवात करणार अशी घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. संभाजीराजे छत्रपती आमचे नेते आहेत. त्यांच्या घोषणेचे स्वागत करतो असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भाजपने वारंवार म्हटले आहे की, स्वतःचा झेंडा हाती घेणार नाही रस्त्यावर उतरणार नाही. परंतु जे कोणी मराठा समाजाला लवकर आरक्षण मिळण्यासाठी आणि आरक्षण मिळेपर्यंत सवलती मिळवून देण्यासाठी काम करतील आणि ते राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार जरी असतील तरी त्यांच्या पाठी आम्ही उभे राहणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. संभाजीराजे भाजपचे नेते आहेत, शाहु महाराजांचे वंशज आहेत. पण त्यांना आमचे सहकार्य हवे असल्यास त्यांच्या पाठीशी आहोत असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -