घरमहाराष्ट्रमुंबई कोस्टल रोडमध्ये १ हजार ६०० कोटींचा भ्रष्टाचार; आशिष शेलार यांचा शिवसेनेवर...

मुंबई कोस्टल रोडमध्ये १ हजार ६०० कोटींचा भ्रष्टाचार; आशिष शेलार यांचा शिवसेनेवर आरोप

Subscribe

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबई कोस्टल रोडमध्ये १ हजार ६०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेनेवर केला आहे. मुंबई कोस्टल रोडचं काम निकृष्ट दर्जाचं आहे, असा दावा देखील त्यांनी केला. कोस्टल रोड प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचाराचा तवंग निर्माण झाला आहे, असं शेलार म्हणाले.

आशिष शेलार यांनी शनिवारी मुंबई कोस्टल रोडसंदर्भात पत्रकार परिषद घेत मुंबई महानरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. “आज मी महापालिकेवर आणि सत्ताधाऱ्यांवर थेट भ्रष्टाचार, अपव्यवहार आणि मुंबईकरांची लूटमार ही १ हजार ६०० कोटींची आहे. मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचार, अपव्यवहार आणि लूटमार महापालिका आणि सत्ताधाऱ्यांची १ हजार ६०० कोटींची आहे. मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टच्या कामात भ्रष्टाचाराचा तवंग यायला लागला आहे,” असं शेलार म्हणाले. तसंच, करुन दाखवलं म्हणणाऱ्यांचा लोकांच्या जिवाशी खेळ सुरु आहे, अशी टीका शेलार यांनी केली.

- Advertisement -

याआधी देखील शेलार यांनी या कोस्टल रोडमध्ये १ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पालिकेनं स्पष्टीकरण दिलं होतं. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून ते निराधार असल्याचे मुंबई महानगरपालिकेने म्हटलं होतं. कोस्टल रोडच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचे आरोप महानगरपालिका प्रशासनाने पूर्णपणे फेटाळले होते. तसंच, यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून आरोपांबाबत मुद्देनिहाय वस्तुस्थितीदर्शक माहिती देण्यात आली होती.

#Live : भाजप आमदार आशिष शेलार लाईव्ह

#Live : भाजप आमदार आशिष शेलार ल#liveshow

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Saturday, 2 October 2021

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -