घरमहाराष्ट्र"शिवसेना, मुंबई पालिका आयुक्तांना खुलं आव्हान...''; 'गाई'च्या घटनेवरून आशिष शेलारांची टीका

“शिवसेना, मुंबई पालिका आयुक्तांना खुलं आव्हान…”; ‘गाई’च्या घटनेवरून आशिष शेलारांची टीका

Subscribe

गटाराचे झाकण गायीनं स्वत: उघडल्याचं मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं समोर आलं. यावरून भाजपा आमदार राम कदम यांनी पुन्हा एकदा महापालिकेला टार्गेट केलं होतं. अशातच आता पालिका आधिकाऱ्यांच्या या वक्तव्यावरव भाजपा नेते आशिष शेलार यांनीही टीका केली आहे.

मुंबईच्या दादर परिसरातील कबुतरखान्याजवळ एका ड्रेनेजच्या टाकीत गाय अडकल्याची घटना घडली. मात्र, यासर्व घटनेनंतर या गटाराचे झाकण गायीनं स्वत: उघडल्याचं मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं समोर आलं. यावरून भाजपा आमदार राम कदम यांनी पुन्हा एकदा महापालिकेला टार्गेट केलं होतं. अशातच आता पालिका आधिकाऱ्यांच्या या वक्तव्यावरव भाजपा नेते आशिष शेलार यांनीही टीका केली आहे.

”शिवसेना आणि मुंबई आयुक्त यांना खुले आव्हान करतो, शिवाजी पार्कमध्ये गाई आणू फक्त गाय झाकण हलवते कशी? त्याचं प्रात्यक्षिक अहवालात दिल्याप्रमाणे आम्हाला करून दाखवा अन्यथा प्राणिमात्रांची कुचेष्ठा करण्याच्या आरोपाखाली तुमच्यावर गुन्हा दाखल का व्हायला नको ते स्पष्ट करा” असं सवाल विचारत आशिष शेलार यांनी शिवसेना आणि महापालिकेवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार यांनी दादर परिसरातील ड्रेनेजच्या टाकीत अडकलेल्या गाईबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी ”चेष्टा मुंबईकरांची ती काय, ही मुंबईकरांची चेष्टा आहे तो हवाल आहे आणि हिंदु मनाची कुचेष्टा म्हणजे गाईच्या वासरावर केलेला आरोप मला शिवसेनेच्या नेत्यांना आणि मुंबई महापालिका आयुक्त चहल साहेबांना खुलं आवाहन आहे. शिवाजी पार्क किंवा दादर मध्ये पुन्हा एकदा झाकण ठेवू, तुम्हा सांगाल तेवढ्या गाई आणू आणि गाय झाकण हलवते कशी याचा सार्वजनिक तुम्हा आहवालातला प्रत्यय तुम्ही आम्हाला करून दाखवा. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर, प्राणिमात्रांची कुचेष्ठा करण्याच्या आरोपाखाली तुमच्यावर गुन्हा दाखल का व्हायला नको ते स्पष्ट करा”, असं शेलार यांनी म्हटलं.

दरम्यान या मुद्द्यावरून भाजपा आमदार राम कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातुन काल महापालिकेवर निशाणा साधला. ”नासा वैज्ञानिकांनी विशेष मागणी करून मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना सल्ला घेण्यासाठी पाचारण केले. आहो खर आहे. त्यांचा नवीन शोध पाहा भ्रष्ट मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी म्हणतात, गायीने स्वतः रस्त्यावरील गटाराचे झाकण उघडले.” असं राम कदम यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

- Advertisement -

मुंबईतील दादर भागात असलेल्या भवानी शंकर रोडवरील कबुतर खाना परिसरात सोमवारी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास गाय एका ड्रेनजमध्ये पडल्याची घटना घडली. गाय ड्रेनेज टाकीच्या झाकणावर उभी होती, त्यावेळी ड्रेनेजचे झाकण सरकलं आणि गाय टाकीत पडली, अशी माहिती उपस्थित स्थानिकांनी दिली होती. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महापालिकेचे व अग्निशमन दलाचे जवान आणि कर्मचारी दाखल झाले. त्यांनी काही तासांनंतर गायीला सुखरुप बाहेर काढले.

दरम्यान, येत्या काळात मुंबई महापालिका निवडूक होणार आहेत. त्यासाठी सर्वपक्षीय नेते तयारीकरत आहेत. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. नुकताचा देशातील ५ राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं ४ राज्यांत स्वबळावर विजय मिळवला. त्यामुळं मुंबईतही येत्या काळात भाजपाची सत्ता येणार का अशी चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा – “मुंबई महापालिका अधिकाऱ्यांचा नवा शोध…”; भाजपा आमदार राम कदमांचा टोला!

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -