भाजपची बदनामी करणाऱ्या तिन्ही पक्षांचा सुनियोजित पद्धतीने भांडाफोड करणार, आशिष शेलारांचा इशारा

ashish shelar press after bjp core meeting will expose mahavikas aghadi
भाजपची बदनामी करणाऱ्या तिन्ही पक्षांचा सुनियोजित पद्धतीने भांडाफोड करणार, आशिष शेलारांचा इशारा

भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये संपुर्ण राज्याच्या भाजप संघटनेच्या कामाचा आढावा घेतला. प्रामाणिकपणे बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे ९७ हजार ३१५ राज्यात बुथ आहेत. त्यापैकी ९२ हजार ८९१ बुथपर्यंत एक बुथ प्रमुख आणि बरोबर समितीची बुथ याची संपुर्ण रचना पुर्ण करु शकलो असल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. संपुर्ण महाराष्ट्रात एकच राजकीय पक्ष आहे जो महाराष्ट्रभर पसरला असल्याचेही शेलार यांनी सांगितले आहे. राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली आहे. भाजपची बदनामी करणाऱ्या तिन्ही पक्षांविरोधात सुनियोजित पद्धतीने भांडाफोड करणार असल्याचा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी आशिष शेलार यांनी सांगितले की, साधारणता या बैठकीतून येणाऱ्या काळात संपुर्ण राज्याच्या भाजप संघटनेच्या कामाचा आढावा घेतला. संपुर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर एकच राजकीय पक्ष असून तो भाजप आहे. १५ विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी सुद्धा स्वतःच्या ताकदीवर आवश्यकते एवढं यश संरक्षित करण्याचीही योजना केली असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

राजकीय विश्लेषण पूर्ण राज्याचे महाविकास आघाडीच्या कृत्याचे, भ्रष्टाचाराचे, गैरकारभाराचे या विषयातले पेपर म्हणून जनतेसमोर जाणार असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील सरकारबद्दल बदनामीचा कट सुनियोजितपणे सत्ताधारी ३ पक्ष करत आहेत. कधी एकत्र मिळून कट रचतात तर कधी विरोधात राहून करत आहेत. असत्याच्या पेरणीच्या आधारावर यशाची गुढी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तो सफल होऊच शकत नाही. महाराष्ट्रातील जनता त्याला थारा देऊ शकणार नाही. बदनाम करणाऱ्या पक्षांच्याविरोधात भांडाफोड सुनियोजित पद्धतीने करण्याचा कार्यक्रम आयोजित करणार असल्याचा इशारा आशिष शेलारांनी दिला आहे.

महाराष्ट्रातील जनतेला जे आवश्यक आहे ते विकासानुरुप मिळत नाही. सगळ्या समाजाला मिळत नाही. राज्यातील मराठा, ओबीसी अशा सगळ्यात समजाला काही दिले नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार देऊ शकणार नाही. ते मिळवण्यासाठी आंदोलनात्मक कार्यक्रमाची रुपरेशा करतो आहोत अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील जनेताला विकासापासून दूर ठेवण्याचे काम करत आहेत त्याबाबत सळो की पळो करुन सोडणार आहोत. तसेच केंद्र सरकारच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहचवणार असल्याचेही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : दसऱ्यानंतर आगामी निवडणुकांच्या तयारीला लागणार, राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर नवाब मलिक यांचे वक्तव्य