घरमहाराष्ट्र...तर ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ, आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

…तर ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ, आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

Subscribe

एकटे लपून दगड मारणार आहात, तर काळोखात असे दगड अन्य ठिकाणांवरूनही येऊ शकतात, याचंही भान त्यांनी ठेवावं. टिक फॉर टॅकला आम्ही घाबरत नाही. टिक फॉर टॅकला उत्तर द्यायला गेली 27 वर्ष आम्ही समर्थ आहोत. पण कायद्याच्या चौकटीत राहून अभियान करण्याची आमची भूमिका आहे. लोकशाहीला लोकशाहीनं उत्तर देऊ. ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ, असा इशाराच आशिष शेलारांनी दिलाय.

मुंबईः टिक फॉर टॅकला आम्ही घाबरत नाही. टिक फॉर टॅकला उत्तर द्यायला गेली 27 वर्ष आम्ही समर्थ आहोत. पण कायद्याच्या चौकटीत राहून अभियान करण्याची आमची भूमिका आहे. लोकशाहीला लोकशाहीनं उत्तर देऊ. ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलारांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. मुंबईतील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आज भाजपचे मुंबईचे सर्व आमदार व खासदार यांची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी आशिष शेलार बोलत होते.

भाजपचा पोलखोलचा कार्यक्रम हा परवानग्या घेऊन चाललेला कार्यक्रम आहे. अधिकृत सर्व परवानग्या घेऊन रस्त्यावर आणि मैदानात हा कार्यक्रम होत आहे. लोकशाहीच्या मार्गाने जनतेचे महत्त्वाचे प्रश्न आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची मांडणी आम्ही पोलखोलमधून करीत आहोत. मला वाटतं लोकशाहीमध्ये अधिकृत अशा चाललेल्या कार्यक्रमावर एखाद-दुसरा व्यक्ती येऊन हल्ला करणं, शिवीगाळ करणं हे नामर्दपणाचं लक्षण आहे. लाड, साटम, तमीर सेल्व्हन या सर्व नेत्यांच्या सभेत जो दंगा घालण्याचा प्रयत्न केला, तो पोलिसांनी थांबवावा, कायद्याचं राज्य आहे, याचा परिचय मुंबई आणि महाराष्ट्राला करून द्यावा, असंही आशिष शेलारांनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -

मोहित कंबोज स्वतः एका गाडीतून जात होते. एकट्याला गाडीत बघून पाच-पंचवीस लोकांनी एकत्र यायचं. ज्याला मॉब लिंचिंग म्हणतात किंवा झुंडशाही, झुंडबळी घेण्याचा प्रयत्न हा काल त्या ठिकाणी झाला. गंभीर विषय आहे. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. पोलखोलचे कार्यक्रम कुठेच थांबणार नाहीत. ते दुप्पट गतीनं आम्ही जनतेत घेऊन जाऊ. एकट्या गाडीनं जाणाऱ्यावर 25 लोक येत असाल, तर तुम्हीसुद्धा कधी तरी गाडीनं एकटे जाणार आहात, हेही तुम्ही लक्षात ठेवा. एकटे लपून दगड मारणार आहात, तर काळोखात असे दगड अन्य ठिकाणांवरूनही येऊ शकतात, याचंही भान त्यांनी ठेवावं. टिक फॉर टॅकला आम्ही घाबरत नाही. टिक फॉर टॅकला उत्तर द्यायला गेली 27 वर्ष आम्ही समर्थ आहोत. पण कायद्याच्या चौकटीत राहून अभियान करण्याची आमची भूमिका आहे. लोकशाहीला लोकशाहीनं उत्तर देऊ. ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ, असा इशाराच आशिष शेलारांनी दिलाय.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून गंभीर विषय जो राज्यांमध्ये दिसतोय, त्या विषयाकडे महाराष्ट्राच्या जनतेचं आम्ही लक्ष वेधतो आहोत. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट नाही, तर मोडकळीस आली आहे. ती संपलीय आणि जणू काही अराजकतेची परिस्थिती निर्माण होतेय. त्याचं सर्वस्वी पाप सत्ताधाऱ्यांचं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरावरच पोलीस प्रोटेक्शन नाही. असुरक्षितता आहे. कालपासून पाहतोय मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान यावर जी काही गर्दी जमतेय. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा पोलिसांवर भरवसा आहे का? हाही प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचे घर सुरक्षित नाही. मुख्यमंत्र्यांचा पक्ष पोलिसांवर भरवसा ठेवत नाही आहे. आम्ही ऐकलं होतं कायदा आंधळा असतो. आंधळा यासाठी असतो कारण त्यानं निष्पक्ष वागायचं असतं. पण पक्षपातीपणासाठी कायदा आंधळा होतो हे आज अख्खा महाराष्ट्र बघतोय, असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारला टोला लगावलाय.

- Advertisement -

महाराष्ट्रात अराजकतेची परिस्थिती; सर्वस्वी सत्ताधाऱ्यांचं पाप

पोलिसांकडून, गृह विभागाकडून पक्षपातीपणा होतोय, असंच चित्र दिसतंय. प्रकरण संवेदनशील आहे म्हणून थोडक्यात सांगायचे झाल्यास शरद पवारांच्या घरावर कोणी गेलं तर त्याला वेगळा न्याय आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरावर चाल करून गेलेल्यांना वेगळा न्याय हा पक्षपातीपणा इकडे आहे. धनंजय मुंडे यांच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या प्रकरणात वेगळा न्याय आणि गणेश नाईकांवर केलेल्या आरोपांमध्ये वेगळा न्याय, कायदा पक्षपातीपणे वागतोय. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. पोलीस व्यवस्था नाही, न्यायालयीन व्यवस्थेवर भरवसा नाही. किंबहुना न्यायालयीन व्यवस्थेवर रोष निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतोय. ज्यांनी पोलीस बदल्यांमधला भ्रष्टाचार उघड केला, त्या पोलीस अधिकाऱ्याला व्हिसलब्लोअर म्हटलं पाहिजे तर त्या रश्मी शुक्लांवर गुन्हा दाखल होत आहे. आर्यन खानच्या प्रकरणात जे साक्षीदार होते, त्या साक्षीदारांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे. मी खून म्हणत नाही, मृत्यू म्हणतोय. जे आर्यन खान प्रकरणात इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते, त्यांचा जाहीर पंचनामा सरकार आणि मंत्रीच करत आहेत. किरीट सोमय्या सोलापूरला कम्प्लेनंट म्हणून तक्रार करायला जाणार तर या राज्यात कम्प्लेनंटलाच अरेस्ट होतेय. याचा अर्थ राज्यात तक्रारदार सुरक्षित नाही. साक्षीदार सुरक्षित नाही. पंच सुरक्षित नाही. तपास अधिकारी सुरक्षित नाही. या राज्यात पोलिसी न्याय पक्षपातीपणे चाललाय. या राज्यात झुंडबळी घेण्याचे प्रकार दिवसागणिक सुरू झालेत. लोकशाही मार्गानं कुठलेही कार्यक्रम चालू ठेवण्यात पोलिसांची तर अडचण आहेच, पण सत्ताधाऱ्यांची दंगेखोरी आहे. म्हणून राज्य अराजकतेच्या दिशेनं चाललंय. या गोष्टीसुद्धा आम्ही जनतेच्या न्यायालयात मांडत असल्याचंही आशिष शेलारांनी सांगितलंय.


हेही वाचाः मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत तरीही पगार मिळतोय, नवनीत राणांचा घणाघात

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -