प्रकाश आंबेडकरांसाठी आम्ही प्रयत्न केले, पण…, अशोक चव्हाणांचं मोठं विधान

ASHOK CHAVAN

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीने युती केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत दोन्ही पक्षांची युती झाल्याचे जाहीर केले. मात्र, महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांसोबत प्रकाश आंबेडकरांची कोणतीही चर्चा झाली नाही. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आले तर त्यांचे स्वागतच आहे. आंबेडकरांसाठी मी मागे प्रयत्न केले होते. परंतु जमलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या प्रयत्नांना यश येत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यांचं जे काही मत आहे ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

महाविकास आघाडीबाबत त्यांची चर्चा उद्धव ठाकरेंसोबत झालेलीच आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी अद्याप या विषयावर काही भाष्य नाही. त्यामुळे ज्यावेळेस ते होईल, त्यावेळी ते समजायचं झालं म्हणून, असा खुलासा शरद पवारांनी केलाय. उद्धव ठाकरेंसोबत त्यांचं बोलणं झालंय, पण महाविकास आघाडीच्या दोन घटकपक्षांशी अद्यापही बोलणं झालेलं नाही, असं चव्हाण म्हणाले.

युतीच्या घोषणेनंतर खासदार संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात वाकयूद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे भाजपाचेच असल्याचे म्हटले होते, त्यावर संजय राऊत यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती यांच्यात स्थिरता आहे की अस्थिरता?, असा देखील एक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.


हेही वाचा : मुंबईत पाण्यासाठी आणीबाणी, नागरिकांची उडाली तारांबळ