घरमहाराष्ट्रऔरंगाबादच्या खुलताबादमध्ये आणखी १ संशयित दहशतवादी अटकेत

औरंगाबादच्या खुलताबादमध्ये आणखी १ संशयित दहशतवादी अटकेत

Subscribe

पाकिस्तान सीमेवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट देण्यात आला असतानाच आता औरंगाबादमधल्या खुलताबादमधून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले आहे. हा संशयित पेशाने डॉक्टर असून अन्न-पाण्यातून त्याने विषबाधेचा प्रयत्न केल्याचा संशय दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) आहे. काही दिवसांपूर्वी मुंब्रा आणि औरंगाबादमधूनच एकूण ९ संशयित दहशतवाद्यांना एटीएसने ताब्यात घेतलं होतं. सदर डॉक्टर या ९ संशयितांच्या संपर्कात होता असा संशय देखील एटीएसला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. दरम्यान संबंधित डॉक्टरने जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचा देखील एटीएसला संशय आहे.

गेल्या काही दिवसांपासून या डॉक्टरची चौकशी सुरू होती. पाकिस्तानी मिलिटरी इंटेलिजन्स (MI) आणि इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI) या संघटनांनी काही दहशतवादी भारतीय लष्कराच्या धान्यसाठ्यात, जेवणात विष मिसळून घातपात करण्याची शक्यता वर्तवली होती. यासाठी काही पाकिस्तानी मोबाईल क्रमांकांच्या संदेशांचा आधार घेण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर लष्कराला अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता अटक करण्यात आलेला डॉक्टर अन्न-पाण्यात विष कालवण्याच्या याच कटात सहभागी असल्याचा संशय एटीएसला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -