घरमहाराष्ट्रऔरंगाबाद खंडपीठ बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सर्तक

औरंगाबाद खंडपीठ बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सर्तक

Subscribe

पोलिसांनी अज्ञाताविरोधात याचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन कोणी केला याचा शोध पोलीस घेत आहेत. औरंगाबाद येथील पोलीस नियंत्रण कक्षाला मंगळवारी सांयकाळी पावणे सहाच्या सुमारास हा निनावी फोन आला. उच्च न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. या फोनमुळे सुरक्षा यंत्रणा सर्तक झाली. उच्च न्यायालयात तत्काळ बॉम्ब शोधक व नाशक पथक पाठवण्यात आले.

मुबईः मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन बुधवारी आला आणि एकच खळबळ उडाली. धमकीच्या फोननंतर तत्काळ बॉम्ब शोधक व नाशक पथक न्यायालयात पोहोचले. या पथकाने न्यायालयाचा कोपरांकोपरा पिंजून काढला. बॉम्ब शोधक व नाशक पथकाला न्यायालय परिसरात बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू आढळली नाही. त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

औरंगाबाद पोलिसांनी अज्ञाताविरोधात याचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन कोणी केला याचा शोध पोलीस घेत आहेत. औरंगाबाद येथील पोलीस नियंत्रण कक्षाला मंगळवारी सांयकाळी पावणे सहाच्या सुमारास हा निनावी फोन आला. उच्च न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. या फोनमुळे सुरक्षा यंत्रणा सर्तक झाली. उच्च न्यायालयात तत्काळ बॉम्ब शोधक व नाशक पथक पाठवण्यात आले. या पथकाने न्यायालय परिसरात बॉम्ब शोध घेण्यास सुरुवात केली. न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, वकील व पक्षकार यांच्यामध्ये भीतीचे वातावरण होते. शोध मोहिमेत या पथकाच्या हाती काहीच लागले नाही. बॉम्ब सदृश्य कोणतीही संशयास्पद वस्तू या पथकाला सापडली नाही. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

- Advertisement -

पोलिसांनी या निनावी फोनसंदर्भात गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. हा फोन कोणी केला. कोणत्या प्रांतातून करण्यात आला याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र सोमवारी अशाच प्रकारे पुण्यातील गुगलचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. या धमकीमुळे एकच खळबळ उडाली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या पथकाने गुगल कार्यालय व आसपासच्या परिसराची पाहाणी केली. या पथकाला बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू सापडली नाही. या धमकीमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. नागरिक भीतीच्या सावटाखाली होते. पोलिसांनी या निनावी फोनचा गुन्हा दाखल केला. हा फोन करणाऱ्याचा शोध पोलिसांनी सुरु केला. तपास करत पोलिसांनी हा फोन करणाऱ्याला हैदराबाद येथून अटक केली. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -