घरमहाराष्ट्रऔरंगाबादमध्ये शिवसेनेच्या आणखी एका नगरसेवकाचा कोरोनाने मृत्यू

औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या आणखी एका नगरसेवकाचा कोरोनाने मृत्यू

Subscribe

शिवसेनेला दुसरा दुख:द धक्का

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असून मुंबई पुण्यापाठोपाठ औरंगाबादमध्ये देखील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान कोरोनामुळे शिवसेनेचे नेते नितीन साळवी यांचे निधन झाले होते. त्यानंतर आता आणखी एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या दुख:द प्रसंगामुळे शिवसेनेला दुसरा दुख:द धक्का बसला आहे.

न्यूज १८ लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, औरंगाबाद शहरातील पडेगाव परिसरातील नगरसेवक रावसाहेब आमले यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. बुधवारी पहाटे ४ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान रावसाहेब आमले यांच्यावर आज प्लाझमा थेरपी होणार होती. मात्र, थेरपी करण्याआधीच त्यांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी शिवसेनेचे नेते नगरसेवक नितीन साळवी यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर आणखी एका नगरसेवकाच्या निधनामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. या दुखःद बातमी नंतर सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अशी भावना व्यक्त केली की, ‘आमचे दोन्ही शिवसेनेचे नगरसेवक हे सक्रीय होते. कोरोनाच्या परिस्थितीत त्यांनी गरजू लोकांकरता मदत कार्य केले होते. धूत हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. आज त्यांच्यावर प्लाझमा थेरपी करण्यात येणार होती, मात्र, थेरपी करण्याआधीच त्यांचा मृत्यू ओढावला. ‘

शहरात पुन्हा लॉकडाऊन

राज्यात एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना दुसरीकडे ‘मिशन बिगीन आगेन’ अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आले आहे. अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्न सुरु असताना अनेक ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन केले जात आहे. मुंबई या पाठोपाठ आता औरंगाबादमध्येही लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. औरंगाबाद शहर आणि वाळुंज परिसरात हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. येत्या १० ते १८ जुलै दरम्यान कडक निर्बंध लागू असणार आहेत.


हवेमार्फत पसरतो कोरोना, WHO ने केले मान्य!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -