घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरऔरंगाबाद येथे मृत व्यक्तींच्या मोबाईलवर बूस्टर दिल्याचा मेसेज

औरंगाबाद येथे मृत व्यक्तींच्या मोबाईलवर बूस्टर दिल्याचा मेसेज

Subscribe

कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नसून सरकारतर्फे नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचा सल्ला देण्यात येतोय. पण औरंगाबादमध्ये मात्र तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मोबाईलवर बूस्टर डोस घेतल्याचा मेसेज येत असून त्याचे सर्टीफीकीटही फॉरवर्ड केले जात आहे. यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबांबरोबरच इतर नागरिकांनाही धक्का बसला असून बूस्टर डोसचे हे काय गौडबंगाल आहे असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

येथील बालूंगंजमध्ये राहणाऱ्या रामनाथ प्रसाद (५७) याची तीन महिन्यांपूर्वी एप्रिल महिन्यात अचानक तब्येत बिघडली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर १३ एप्रिलला नगर पालिकेने त्याचे मृत्यूपत्रही कुटुंबाला दिले. पण ७ जुलैला दुपारी १२.४४ मिनिटांनी रामनाथ याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. जो वाचून घरातल्यांना जबर धक्का बसला. कारण मेसेजमध्ये रामनाथ प्रसादने बूस्टर डोस घेतल्याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात आले. नंतर त्याला दोन डोस पूर्ण झाल्याबद्दल मोबाईलवर सर्टीफीकेटही पाठवण्यात आले. हे बघून घरातल्यांना मनस्ताप झाला. आपल्या दुखाची कोणी खिल्ली तर उडवत नाही ना असा विचारही त्यांच्या मनात आला. त्यामुळे खातरजमा करण्यासाठी त्यांनी सरकारी रुग्णालय गाठले. त्यावेळी अनेक जणांना असे मेसेज आल्याचे त्यांना कळाले. तसेच मृत व्यक्तींच्या मोबाईलवरही असे मेसेच आल्याचे तेथील लोकांनी त्यांना सांगितले. यामुळे रामनाथ यांच्या कुटुंबाने याबद्दल आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावर कोवीड पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण देत अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -