घरमहाराष्ट्रराजेश टोपेंच्या विधानामुळे कार्यकर्ते बुचकळ्यात, म्हणाले, 'एकनाथा'च्या विचाराने

राजेश टोपेंच्या विधानामुळे कार्यकर्ते बुचकळ्यात, म्हणाले, ‘एकनाथा’च्या विचाराने

Subscribe

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज पैठणमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी अजित पवार यांच्यासोबत राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी राजे टोपे यांनी केलेल्या भाषणात असं काही विधान केलं की, कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले आहेत. राजेश टोपेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच ‘राष्ट्रवादी पक्ष म्हणजे ‘एकनाथां’च्या (Eknath) विचाराने चालणारी पार्टी असं विधान केलं, या विधानामुळे उपस्थित कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नावाची जगभर चर्चा झाली, गुगलवर एकनाथ शिंदे यांचे नाव मोठ्याप्रमाणात सर्च झालं, खेड्यापाड्यात एकनाथ शिंदे यांचं नाव माहित झालं. यात आता पैठणमधील सभेत राजेश टोपे यांनी ‘राष्ट्रवादी पक्ष म्हणजे ‘एकनाथां’च्या विचाराने चालणारी पार्टी’ आहे, असं विधान केलं, त्यांच्य या विधानामुळे सभेत उपस्थित कार्यकर्ते आणि नेतेही संभ्रमात पडले. पण टोपे यांना संत एकनाथ म्हणायचं होतं असे कळताच नेते कार्यकर्त्यांच्या तोंडावर स्मितहास्य पाहायला मिळाले. मात्र त्यांच्या या विधानाची आता जोरदार चर्चा रंगतेय.

- Advertisement -

राजेश टोपे नेमकं काय म्हणाले?

राजेश टोपे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे काय तर शेतकऱ्यांची पार्टी, सर्वधर्मसमभाव मानणारी पार्टी, ‘एकनाथा’च्या विचाराने चालणारी पार्टी, रंजले गाजले सर्वांना आपली म्हणणारी पार्टी आणि त्यामुळे अशा पार्टीत सर्वांना घेऊन चालण्याचे कार्य केले जाते. तसेच जे कथनी आहे तीच करणी आहे. पैठण तालुक्यात अनेक महत्त्वाची कामे फक्त राष्ट्रवादीमुळे झाली आहेत.


राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांवर हल्ले होतायत, सरकार, पोलीस यंत्रणा झोपली का? अजित पवारांचा संताप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -