घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरलातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर दरोडा, 27 लाखांची रोकड चोरट्यांनी...

लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर दरोडा, 27 लाखांची रोकड चोरट्यांनी पळवली

Subscribe

लातूर – लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ या तालुक्याच्या ठिकाणच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर सोमवारी रात्री चोरट्यांनी दरोडा टाकला. या दरोड्यात चोरट्यांनी 27 लाख रुपयाची रोकड पळवली. पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा दाखर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

चोरट्यांनी 4 तारखेच्या मध्यरात्री शिरूर अनंतपाळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरी केली. बँक सकाळी 10.30 च्या सूमारास उघडल्यानंतर बँकेतील कर्मचाऱ्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. शिरूर अनंतपाळ येथील नगरपंचायतीच्या इमारतीमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कार्यालय आहे. या दरोड्यात 27 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळवल्याची माहिती शाखेचे व्यवस्थापक सौरभ वाल्मीक खैरे यांनी दिली.

- Advertisement -

नेमके काय घडले –

शिरूर अनंतपाळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. अनंतपाळसह तालुक्यातील 14 गावातील लोकांचा व्यवहार या बँकेसोबत चालतो. नेहमीप्रमाणे शाखा व्यवस्थापक बँक उघडण्यासाठी सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास आले असता त्यांना बँकेचा मुख्य दरवाजाचे लॉक तोडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी लातूर येथील रीजनल ऑफिसला याबाबत माहिती दिली. यानंतर पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी घटनास्थळी धाव घेत दरोड्याचा पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -