घरमहाराष्ट्र'बाळासाहेब ठाकरेंचं बोट धरून भाजप राज्यात आले', मिशन १५० वरून शिवसेनेचा पलटवार

‘बाळासाहेब ठाकरेंचं बोट धरून भाजप राज्यात आले’, मिशन १५० वरून शिवसेनेचा पलटवार

Subscribe

मुंबई – मुंबई महानगरपालिका निवडणुकासाठी भाजपाने रणनीती आखली असून आजपासून प्रचाराचा नारळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोडला. भाजपाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १५० चं टार्गेट ठेवलं आहे. यावरून शिवसेनेनेही अमित शाहांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबईकरांना दररोजचे प्रश्न सोडवण्यासाठी कोण भेटतं हे महत्त्वाचं आहे. आमचे शाखाप्रमुख हे मुंबईतील जनतेला प्रथम भेटतात. मुंबईकरांचे प्रश्न शिवसेना समजून घेते. तुमचे मनसुबे आता सर्व राज्यांना आणि सर्व पक्षांना समजले आहेत. सर्व पक्षांना संपवायचं आणि आपलं एकट्याचं राज्य आणण्याचा प्रयत्न आहे. परंतु जनतेला याचं खरं रुप माहिती झालं आहे, असा हल्ला शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा आमच्यासोबत आहे तीच खरी शिवसेना, मुंबई दौऱ्यात अमित शाहांचा झंझावात

अमित शाह म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी फक्त भाजपला फसवलं नाही तर त्यांनी त्यांच्या विचारधारेलाही फसवलं. महाराष्ट्राच्या जनतेच्या जनादेशाचाही त्यांनी अपमान केला. शिवसेनेत बंडखोरी होण्यामागे खुद्द उद्धव ठाकरे आणि त्यांची सत्तापिपासू वृत्ती कारणीभूत आहे. आम्ही कधीच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं नव्हतं. बंद खोलीत नाहीतर खुलेआम राजकारण करणाऱ्यातले आम्ही आहोत, असंही अमित शाह म्हणाले. तसंच, उद्धव ठाकरे खयाली पुलाव बनवत असल्याची टीकाही त्यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – मिशन 150 : मुंबईवर भाजपाचे वर्चस्व असावे; अमित शाहांचा शिंदे गटालाही शह

यावरून शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, “शिवसेना आणि मुंबईच्या नागरिकांचं नातं दृढ आहे. मुंबईची माणसं कृतज्ञ आहेत. दुष्काळात देखील मुंबईला पिण्याचं पाणी मिळतं. त्या पाण्याची प्रतारणा मुंबईचा नागरिक करणार नाही. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी लोकांना कशी मदत केली हे जनतेला माहित आहे. परंतु, यांची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये कोरोना काळात गंगेत प्रेतं वाहून गेल्याचे संपूर्ण देशाने पाहिले आहे.

पुढे ते म्हणाले की, ‘भाजपच्या घोषणांना मुंबईचा नागरिक भूलणार नाही. उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला तर तुम्ही त्यावेळी हा प्रश्न सोडवण्यासाठी येण्यापेक्षा हरियाणाला निघून गेला. दिल्ली, पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातदेखील भाजपला भूईसपाट करू. मागे अमित शाह हे पटक देंगे म्हणाले होते, परंतु नंतर मातोश्रीवर आला होतात हे विसरू नका. ओठात एक आणि पोटात एक असं भाजपचं आहे. भाजपने उपकाराची जाणीव ठेवावी. आताची भाजप शब्द बदलणारी आहे.

हेही वाचा – …तर तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा; आशिष शेलार यांचा शिवसेनेवर पलटवार

‘आम्हाला कोणीही हरवू शकत नाही. महाराष्ट्रात यांचं अस्तित्व नव्हतं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचं बोट धरून राज्यात आले. त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता की आम्ही राष्ट्र पाहतो, तुम्ही राज्य पाहा. परंतु, नंतर भाजपने आपला शब्द फिरवला, अशी टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -