घरताज्या घडामोडीबाभळेश्वर येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार

बाभळेश्वर येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार

Subscribe

परिसरात हल्ले वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत

नाशिकरोड । येथून जवळच असलेल्या बाभळेश्वर गावातील भैरवनाथ मंदिराच्या बाजूला राहत असलेल्या बबन राजू शिंगाडे यांची भाची गुंजन दशरथ नेहेरे (३) ही मंगळवारी (दि.१६) संध्याकाळी साडेसात वाजता अंगणात इतर मुलांबरोबर खेळत असताना शाळेच्या पाठीमागून वाहनांच्या आडोशाने आलेल्या बिबट्याने हल्ला केला. माजी सरपंच श्रीपत टिळे यांच्या भावाने बिबट्याने हल्ला केल्याचे पाहिल्यानंतर आरडाओरडा केल्यानंतर सर्वच नागरिकांनी हातात लाठ्या-काठ्या घेत उसाच्या शेताकडे धाव घेतली. सुमारे दीडशे ते दोनशे लोकांच्या जमावाने हातात बॅटरी, काठ्या घेत उसाच्या शेतात रक्ताच्या डागांचा माग घेत शोध घेतला असता नागरिकांना उसाच्या शेतात गुंजनचा मृतदेह आढळून आला. बिबट्याने तिच्या चेह-यावर व मानेवर जखमा केल्याचे दिसून आले, असे माजी सरपंच टिळे यांनी सांगितले. वनविभागाचे अधिकारी मधूकर गोसावी व पथकाने या ठिकाणी भेट दिली, तेव्हा नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -