घरमहाराष्ट्रशिवसेनेत सगळे वाघाचे बछडे - बच्चू कडू

शिवसेनेत सगळे वाघाचे बछडे – बच्चू कडू

Subscribe

शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली तर राज्यपालांकडे मोर्चा काढू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

‘शिवसेना का घाबरेल? शिवसेनेत तर सगळे वाघाचे बछडे आहेत’, अशी प्रतिक्रिया शिवसेनेला पाठिंबा दिलेले प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांना दिली. आज मातोश्रीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला बच्चू कडू हे देखील उपस्थित राहिले आहेत. दरम्यान यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आपण मातोश्रीवर आल्याचे सांगितले. दरम्यान, त्यांना सध्या शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर विचारले असता त्यांनी युतीचा पेच सोडण्याइतका आमचा आकडा मोठा नाही असे सांगितले. तसेच राजकारणात फोडाफोडी होतच असते त्यामुळे शिवसेनेला घाबरायची गरज नसल्याचे ते म्हणालेत.


हेही वाचा – राज ठाकरे यांच्या भेटीला राष्ट्रवादीचे आमदार

- Advertisement -

‘आधी शेतकरी वाचवा’

दरम्यान, यावेळी त्यांनी सरकार बनेल तेव्हा बनेल अगोदर शेतकरी वाचला पाहिजे, असे म्हटले. त्याचबरोबर जर शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली तर राज्यपालांकडे मोर्चा काढू, असा इशारा देखील बच्चू कडू यांनी यावेळी दिला. दरम्यान, आज मातोश्रीबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक मातोश्रीवर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदारांना मोबाईल आत नेण्यास मनाई करण्यात आली. बैठकीतील कोणतीही चर्चा बाहेर जाऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी घेतली खबरदारी घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -