घरताज्या घडामोडीकेंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा होती, पण... - बाळासाहेब थोरात

केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा होती, पण… – बाळासाहेब थोरात

Subscribe

महाराष्ट्राच्या इतिहासात दुर्दैवी घटना. महाराष्ट्राच्या इतिहासात राजकीय संस्कृती आहे. एकमेकांच्या सन्मान करण्याचीही महाराष्ट्राच्या राजकारणातील संस्कृती आहे. टीका करावी लागते, बोलाव लागत, पण त्याचा स्तर कोणता असतो हे लक्षात घ्याव लागते, असे मत महसूल मंत्री आणि कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. नारायण राणे यांनी जो शब्द वापरला त्याला टीकाही म्हणता येईल. त्यांनी वापरलेला शब्द हा अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या जनेच्या प्रतिनिधित्व हे मुख्यमंत्री करत असतात. त्यांच्या बाबतीत असे शब्द वापरणे अतिशय चुकीचे आहे. नारायण राणे यांच्या वाक्याचा निषेध करतो आहोत. पोलिसांची कारवाई ही द्वेषपूर्ण नव्हती, असेही थोरात यांनी स्पष्ट केले. केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले चार मंत्री हे महाराष्ट्रातील प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा होती. पण तसे घडले नाही. जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान भलतीच वक्तव्ये करताना भाजपचे नेते दिसले अशीही टीका त्यांनी केली.

भाजप राणेंच्या वक्तव्याचा समर्थन करत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपच्या नेत्यांच्या भाषणाचा स्तर हा अलिकडच्या काळात घसरलेला आहे. कुठेतरी भाजपच्या मनात महाराष्ट्रातील राजकारणात नैराश्य आले आहे. त्यामुळेच भाजपकडून अशी खालच्या स्तराची भाषा बोलली जात असल्याचे थोरात म्हणाले. नारायण राणेंनेही केलेले भाषण हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे नाही. या कारवाईचा संबंध कुठेही लावण्याची गरज नाही. त्यामुळे चुकीचे कुणी बोलल तर कारवाई ही होणारच असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हे सगळे लोक मंत्री झाले, तेव्हा वाटल होते की महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी हे लोक मदत करतील. आपली गार्ङाणी सोडवतील. आपल्या अनेक तक्रारी, विषय केंद्राकडे आहेत. ते प्रश्न सुटणे आवश्यक आहेत. ते करणे गरजेचे होते. पण आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने करण्यात येणारी वक्तव्ये दुर्दैवी आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनेतेचे प्रश्न सोडवावेत आणि आशीर्वाद घ्यावेत अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.


हे ही वाचा – आयकर विभागाच्या कारवाईशी माझा संबंध नाही, सोमय्यांच्या दाव्याला भुजबळांचे उत्तर

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -