घरताज्या घडामोडी"ममता बॅनर्जी युपीएच्या सदस्या नाहीत" नेतृत्व काँग्रेसलाच करावं लागणार, बाळासाहेब थोरातांचा पलटवार

“ममता बॅनर्जी युपीएच्या सदस्या नाहीत” नेतृत्व काँग्रेसलाच करावं लागणार, बाळासाहेब थोरातांचा पलटवार

Subscribe

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटी न घेता थेट खासदार राहुल गांधी यांच्यावरच टीका केली आहे. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी बैठक बोलवली आहे. ममता बॅनर्जी यांचे येणं आणि आमची बैठक याचा काहीही संबंध नाही. राज्यातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात येत असल्याचे थोरात यांनी सांगितले आहे. तसेच ममता बॅनर्जी युपीएच्या सदस्या नाहीत. देशात काँग्रेसचे नेतृत्व असल्यामुळे नेतृत्व काँग्रेसलाच करावं लागणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीबाबत माहिती दिली आहे. तसेच त्यांनी ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावरुनही प्रतिक्रिया दिली आहे. थोरात म्हणाले की, ममता बॅनर्जी युपीएच्या सदस्या सुद्धा नाहीत. आतापर्यंत भाजपला काँग्रेस आणि युपीएने विरोध केला आहे. राहुल गांधी यांनी देखील भाजपला विरोध केला आहे. आजही काँग्रेसचे नेतृत्व आहे. यामुळे बोलण्यात काही अर्थ नाही. शेवटी काँग्रेसचे नेतृत्व आहे.

- Advertisement -

नवाब मलिकांची सल्ला देण्याची पात्रता नाही

काँग्रेसने आताचे वास्तव स्वीकारले पाहिजे असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे. यावर थोरात यांनी पलटवार केला आहे. थोरात म्हणाले की, नवाब मलिकांनी काँग्रेसला सल्ला द्यावे हे योग्य नाही. त्यांच्यात तशी पात्रता नाही की त्यांनी काँग्रेसला सल्ला द्यावा.

काँग्रेसची बैठक आढावा घेण्यासाठी

दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र काँग्रेसची बैठक ही राज्यातील प्रश्नांवर आढावा घेण्यासाठी घेतली असल्याचे सांगितले आहे. विधीमंडळ काँग्रेसचा नेता आहे. सगळ्या मंत्र्यांना सोबत घेऊन चर्चा करणे अशी जबाबदारी असते. सर्वांगीण चर्चा होत असते दोन वर्षात कसे काम झाले आणि काय मिळवले तसेच पुढच्या वर्षात काय केले पाहिजे अशा सगळ्या गोष्टींसाठी ही बैठक असल्याचे थोरात म्हणाले.

- Advertisement -

विधानसभा अध्यक्षांची या अधिवेशनात निवड

विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहेत त्याची निवड होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. या अधिवेशनात त्याची निवड होईल असं निश्चित वाटत आहे. निवड निश्चित होणार आहे. मागील वेळचे अधिवेशन पाहिले तर कोरोनाच्या संकटामुळे दोन ते तीन दिवसांचे अधिवेशन घेण्यात आले होते. सगळ्या परिस्थितीमध्ये निवड झाली नाही परंतु आता नक्की केली जाईल असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा :  ममता बॅनर्जी- आदित्य ठाकरेंच्या गुप्त बैठकीत काय ठरलं?, आशिष शेलारांचा सवाल


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -