घरदेश-विदेशबँकांची कामं पटापट उरका; ऑगस्टमध्ये बँका 13 दिवस बंद

बँकांची कामं पटापट उरका; ऑगस्टमध्ये बँका 13 दिवस बंद

Subscribe

ऑगस्ट महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील ते जाणून घ्या

वर्ष 2022 चा 8 वा महिना अवघ्या दिवसांनी सुरु होणार आहे. जर तुम्हालाही या महिन्यात बँकेशी संबंधित काही महत्त्वाच्या कामं करायची असतील तर बँकांच्या सुट्ट्याची लिस्ट नक्की तपासून जा, नाही तर तुम्हाला बँकांसंबंधीत अनेक महत्त्वाच्या कामांसाठी वाट पाहावी लागेल. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातील बँक हॉलिटे लिस्ट पाहून तुम्ही वेळेआधी तुमची बँकांची काम पूर्ण करु शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या सुट्टीच्या यादीनुसार, या महिन्यात देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 13 दिवस बँका बंद राहणार आहेत.

ऑगस्ट महिन्यात 13 दिवस बँका बंद

ऑगस्ट महिन्यात देशाच्या विविध भागात विविध सण साजरे केले जातात. यामध्ये स्वातंत्र्य दिन 2022, रक्षाबंधन 2022, कृष्ण जन्माष्टमी 2022 सारख्या सणांचा समावेश आहे. जर तुम्हाला या महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाच्या काम करायची असल्यास आम्ही तुम्हाला या महिन्यातील सुट्ट्यांची यादी देत आहोत. या महिन्यात शनिवार आणि रविवार असे एकूण 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. ऑगस्ट महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील ते जाणून घ्या (Bank Holidays in August 2022)

- Advertisement -

ऑगस्ट 2022 मधील बँकांच्या सुट्ट्या

1 ऑगस्ट 2022- द्रुपका शे-जी महोत्सव (गंगटोक)

7 ऑगस्ट 2022 – पहिला रविवार

- Advertisement -

8 ऑगस्ट 2022- मोहरम (जम्मू आणि श्रीनगर)

9 ऑगस्ट 2022- चंडीगढ, गुवाहाटी, देहरादून, शिमला, तिरुवनंतपुरम, भुवनेश्वर, जम्मू,
पणजी, शिलाँग वगळता संपूर्ण देशात सुट्टी असेल.

11 ऑगस्ट 2022- रक्षाबंधन (देशभरात सुट्टी)

13 ऑगस्ट 2022- दुसरा शनिवार

14 ऑगस्ट 2022- रविवार

15 ऑगस्ट 2022- स्वातंत्र्य दिन

16 ऑगस्ट 2022- पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये सुट्टी)

18 ऑगस्ट 2022- कृष्ण जन्माष्टमी ( पूर्ण देशभरात सुट्टी)

21 ऑगस्ट 2022- रविवार

28 ऑगस्ट 2022-रविवार

31 ऑगस्ट 2022 – गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँका बंद राहतील)


कर्नाटकात टोल नाक्यावर रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -