घरताज्या घडामोडीBaramati : लोकसभा उमेदवारी-निवडणुकीपूर्वीच सुनेत्रा पवारांचे महाविजयाचे बॅनर

Baramati : लोकसभा उमेदवारी-निवडणुकीपूर्वीच सुनेत्रा पवारांचे महाविजयाचे बॅनर

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीतील जागावाटप अद्याप झालेली नाही. मात्र, जागावाटप होण्यापूर्वीच बारामती लोकसभा मतदासंघ राजकीय वर्तुळाच चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कारण बारामती मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्याची चर्चा रंगली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीतील जागावाटप अद्याप झालेली नाही. मात्र, जागावाटप होण्यापूर्वीच बारामती लोकसभा मतदासंघ राजकीय वर्तुळाच चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कारण बारामती मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यानुसार, बॅनर्स, होडिंग्स बारामतीत लावण्यात आल्या आहेत. अशातच लोकसभा होत नाहीत तोवर सुनेत्रा पवारांच्या महाविजयाचेही बॅनर बारामतीमध्ये लागल्याचे पाहायला मिळत आहे. (baramati sunetra pawar will contest lok sabha elections in baratami banners are up)

बारामती शहरातील सिटी इन चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तथा बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा एक आगळावेगळा फलक लागला आहे. या फलकावर ‘निर्धार महाविजयाचा’ असा संदेश नमूद करण्यात आला आहे. या बॅनरमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार या बारामतीतून निवडणुक लढवतील, हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे सागर काटे या कार्यकर्त्याने लावलेला हा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणूक या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी भाजप आणि काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. परंतु महाराष्ट्रात जागावाटप रखडल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे अधिकृतपणे एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या कन्या विद्यामान खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत रंगणार आहे. या दोन्ही नेत्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रचारही सुरु केला आहे.

दरम्यान, मंगळवारी बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना सुनेत्रा पवार यांनी “दादांना आणि मला तुमची साथ हवी आहे. तुमची साथ असेल तर मी मोठं पाऊल उचलणार आहे. तुमची साथ आवश्यक तुम्ही फक्त मला साथ देणं गरजेचं आहे”, असे म्हणत लोकसभा निवडणुकीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – LOK SABHA : नाशकातून गोडसेंना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचे; श्रीकांत शिंदेंकडून उमेदवारीची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -