घरताज्या घडामोडीसावधान ! नियमांचे उल्लंघन केल्यास मंगल कार्यालय सील

सावधान ! नियमांचे उल्लंघन केल्यास मंगल कार्यालय सील

Subscribe

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचा इशारा

लग्नसमारंभाना परवानगी देतांना ५० जणांच्या उपस्थितीची अट घालण्यात आली आहे. मात्र ५० पेक्षा अधिक वर्‍हाडी असल्यास लॉन्सचालकांना ३० हजार तर वधु वर पक्षास १० हजार असा ४० हजारांचा दंड भरावा लागेल असा इशारा महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिला आहे.

अनलॉकची प्रक्रिया सुरू करतांना विवाह सोहळयांना परवानगी देण्यात आली. मात्र याकरीता संबधित पोलीस ठाण्याची परवानगी असणे आवश्यक आहे शिवाय लग्न सोहळयांना ५० जणांनाच उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. लग्न समारंभाच्या कमीत कमी तीन दिवस अगोदर आयोजकांनी रीतसर माहिती कळविणे बंधनकारक राहील तसेच परवानगी आदेशाचे पहिल्यांदा उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास लॉन्सधारक मालकावर २० हजार रूपयचे तर वधू-वर पक्षावर प्रत्येकी १० हजार रुपये दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. दुसर्‍यांदा उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास कार्यालय सील करण्यात येईल अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

… तर दुकानदारांना दंड
दोन महिन्यांनंतर बाजारपेठा पूर्ववत सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अर्थचक्राला गती मिळाली आहे. सर्व व्यवहार सुरू करतांना व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र बाजारपेठेतील गर्दी पाहता कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर शनिवार, रविवार विकेंड लॉकडाऊन राहणार आहे. परंतू व्यावसायिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास दुकानदारास ५ हजार रूपये दंड तर ग्राहकास १ हजार रूपये दंड आकारण्यात येईल जर दुसर्‍यांदा उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास दुकाने अस्थापना कोविड-१९ अधिसूचना रद्द होईपर्यंत अथवा पुढील आदेश होई पावेतो सील बंद करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आल्याचे आयुक्तांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -