घरमुंबईकामगार अध्यक्ष सांगत ५४ हजारांची मागितली खंडणी

कामगार अध्यक्ष सांगत ५४ हजारांची मागितली खंडणी

Subscribe

शनिवारी ४७ वर्षीय गृहउद्योग करणाऱ्या व्यापाऱ्याने खंडणी मागणाऱ्या भामट्यांविरोधात देहूरोड पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

पुण्यात गृहउद्योग चालवणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून दोन भामट्यांनी ५४ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही घटना पिंपरी-चिंचवडच्या किवळे विभागात घडली. आपण कामगार अध्यक्ष असून तुमच्याकडे बालकामगार काम करत आढळून आल्याचे त्यांनी व्यापाऱ्याला सांगतले होते. त्यामुळे या मोबदल्यात भामट्यांनी व्यापाऱ्याकडून खंडणी मागितली होती. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोन्ही भामट्यांना अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

शुक्रवारी दुपारच्या सुमारास देवीचंद्र ज्ञानेश्वर देवकुळे (३६) आणि राकेश देविदास वाघमोडे (३३) हे दोन इसम किवळे येथील एका गृहउद्योग करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे गेले. तिथे जाऊन आरोपी देवीचंद्र याने मी कामगार अध्यक्ष असल्याची बतावणी केली. आरोपींनी तुमच्याकडे बालकामगार असल्याचे सांगत व्यापार्याकडून ५४ हजार रुपयांची खंडणी मागितली. शिवाय, ही बाब कुणालाही सांगत नाही, असे देखील आरोपींनी व्यापाऱ्याला सांगितले.

- Advertisement -

व्यापाऱ्याने केली पोलिसात तक्रार दाखल

याप्रकरणी शनिवारी देहूरोड पोलिसात ४७ वर्षीय गृहउद्योग करणाऱ्या व्यापाऱ्याने भामट्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रात्री उशिरा देहूरोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.आरोपी देवीचंद्र ज्ञानेश्वर देवकुळे याच्याकडे ह्युमन राईटचे ओळख पत्र मिळाले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक योगेश जाधव हे करत आहेत.


हेही वाचा – paytm खंडणी प्रकरणः फ्लॅट घेण्यासाठी मागितली होती खंडणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -