घरमहाराष्ट्रभगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

Subscribe

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 रोजी संपला. त्यांनी 30 ऑगस्ट 2014 रोजी राज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राज्यपालपदी कोण येणार याविषयी चर्चा सुरू झाली होती.

भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला. उत्तराखंडमधील भाजपाचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षातील प्रवास आहे. तसेच उत्तराखंडमधील भाजपाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. 2001 ते 2002 मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा कारभार पाहिला होता. तसेच 2002 पासून 2007 पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. 2008 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले होते. भगत सिंह कोश्यारी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक आहे.

- Advertisement -

1977 मधील आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरूंगवासही भोगलेला आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि तेलंगणाच्या राज्यपालांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कलराज मिश्रा यांची राजस्थान, बंडारू दत्तात्रय यांची हिमाचल प्रदेश, आरीफ मोहम्मद खान यांची केरळ आणि तमिलीसाई सौंदराजन यांची तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -