घरताज्या घडामोडीभगतसिंह कोश्यारी आपल्याकडेच ठेवणार चार्ज, गोव्याऐवजी शिंदेंना मुंबईलाच यावे लागणार

भगतसिंह कोश्यारी आपल्याकडेच ठेवणार चार्ज, गोव्याऐवजी शिंदेंना मुंबईलाच यावे लागणार

Subscribe

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आपल्या आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र घेऊन एकनाथ शिंदे मुंबईत रवाना होणार होते. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे एकनाथ शिंदे पाठिंब्याचं पत्र घेऊन गोव्याला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यामुळे त्यांचा चार्ज गोव्याच्या राज्यपालांकडे देण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु राज्यपाल कार्यालयाने कोणाकडेही चार्ज दिला जाणार नसल्याचे म्हटले आहे.

राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्यामुळे गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांच्याकडे तात्पुरता पदभार सांभाळण्यासाठी देणार असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु राज्यपाल कार्यालयाने कोणाकडेही चार्ज दिला जाणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिंदेंना पाठिंब्याचं पत्र घेऊन गोव्याला जाण्याची शक्यता कमी असून त्यांना मुंबईलाच यावे लागणार आहे. राज्यपाल व्हिडीओ कॉ़न्फरन्सींगद्वारे उपलब्ध राहणार असल्यामुळे शिंदे यांना राज्यपाल भवनात यावे लागणार आहे.

- Advertisement -

आसाममधील गुवाहाटीच्या रॅडिसन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे आणि पाठिंबा देणारे अपक्ष आमदार आहेत. ही संख्या ४० असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी शिंदे स्वत: राज्यपालांना भेटण्यास जाण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : कोश्यारींना कोरोना झाल्यानंतर शिंदे पाठिंब्याचं पत्र घेऊन गोव्याला जाण्याची शक्यता

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -