घरमहाराष्ट्रBhaskar Jadhav : विधानसभेला भाजप शिंदेंना सोबत घेणार नाही, भास्कर जाधवांचा दावा

Bhaskar Jadhav : विधानसभेला भाजप शिंदेंना सोबत घेणार नाही, भास्कर जाधवांचा दावा

Subscribe

 

मुंबईः आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप एकनाथ शिंदे गटाला सोबत घेणार नाही. लोकसभा निवडणुकीतही भाजपला केवळ ७ जागांवर विजय मिळेल, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.

- Advertisement -

भाजपने एका सर्वेक्षण केलं आहे. त्या सर्वेक्षणाचा गोपनीय अहवाल माझ्याकडे आहे. महाविकास आघाडीशी लढत देताना भाजपचा दारुण पराभव होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचे ७ उमेदवार निवडून येतील. विजयी उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत तर भाजप शिंदे गटाला सोबत घेणार नाही,असा दावा भास्कर जाधव यांनी केला.

हेही वाचाःAjit Pawar : आमदार काय काय मागतात तुम्हाला सांगता येणार नाही; अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून टोला

- Advertisement -

भास्कर जाधव म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीप्रमाणे आगामी निवडणुकीतही भाजप खेळी खेळणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उद्धव ठाकरे यांना सोबत घेतले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उद्वव ठाकरे यांना बाजुला केलं. तसंच ते आताही करणार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप शिंदेंना सोबत घेईल पण विधानसभा निवडणुकीत ते शिंदेंना बाजूला करतील. ना घर का ना घाट का, अशी अवस्था शिंदे यांची होणार आहे.

हेही वाचाःEknath Shinde : रोडकरी, पुलकरी आता पोर्टकरी…; ‘या’ नेत्याचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ ४९ जागांवर विजय मिळणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत तर भाजपचे अवघे २८ नगरसेवक निवडून येतील, असे भाकीत भास्कर जाधव यांनी केले आहे.

नाना पटोलेंवर व्यक्त केली होती नाराजी

काँग्रेस महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लोकसत्ताला दिलेली मुलाखत मी वाचली. तसेच मी राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांचीही मुलाखत पाहिली. परंतु बैठकीत न ठरलेले मुद्देही मुलाखतीत मांडले, असं भास्कर जाधव गेल्या महिन्यात म्हणाले होते. सिल्व्हर ओकवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली होती. या बैठकीत काय धोरणात्मक निर्णय झाला ते तिन्ही पक्षांना सांगितलं होतं. मात्र, काँग्रेसचे नाना पटोले आणि जयंत पाटील यांनी आपली भूमिका व्यक्त केली. परंतु तिघांनी समोर येऊन एक सांगायचं आणि मुलाखतीत मात्र वेगळं काही सांगायचं, असं भास्कर जाधव म्हणाले.

सभागृहात बोलू दिले जात नसल्याची खंत

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधीमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होत, गुढीपाडव्यासाठी गावी जात असून, आता पुढचे तीन दिवस सभागृहात येणार नसल्याचे म्हटले आहे. सभागृहात बोलू दिले जात नाही, त्यामुळे आता सभागृहात येण्याची इच्छा नाही, असे भास्कर जाधव य़ांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले होते. भास्कर जाधव हा सभागृहातील एकही दिवस चुकवत नाही. पुढचे तीन दिवस सभागृहात येणार नाही, याबाबत मनात खूप वेदना आहेत. या वेळच्या अधिवेशनात मला जाणीवपूर्वक बोलू दिले जात नाही. मला विषयही मांडू दिले जात नाहीत. मी नियमाने बोलण्याचा प्रयत्न करत आहे. हे अधिवेशन, सभागृह आणि कामकाज नियमाने चालावे, कायद्याने आणि घटनेने चालावे, प्रथा आणि परंपरेने चालावे, यासाठी मी आग्रही असतो. सभागृहात लक्षवेधी मांडण्याचे काम सुरु आहे. परंतु, मी माझ्या किमान दोन लक्षवेधी लागाव्या यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु माझी एकही लक्षवेधी लागू शकली नाही. म्हणून मनामध्ये अत्यंत वेदना आहेत, असेही भास्कर जाधव म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -