मोठी बातमी : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, सुभाष देसाईंचा मुलगा शिंदे गटात

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अजून धक्का शिंदे गटाकडून देण्यात आला आहे. त्यासोबतच सुभाष देसाईंच्या घरात फूट पडल्याचं दिसत आहे. माजी उद्योगमंत्री आणि ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे.

Big blow to Uddhav Thackeray group, Subhash Desai's son Bhushan Desai in Shinde group

मुंबई – उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोमवारी मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे एकनिष्ठ माजी उद्योग मंत्री सुभाष देसाईंच्या घरात फूट पडली आहे. सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. (Bhushan Desai Join Shivsena Eknath Shinde Group)

ज्यांना वॉशिंग मशिनमध्ये उडी मारायची त्यांना मारु द्या – आदित्य ठाकरे
भूषण देसाई हे काही शिवसेनेत नव्हते. ज्यांना वॉशिंग मशिमध्ये उड्या मारायच्या आहेत, त्यांना मारु द्या. भूषण देसाई जाणे, हा काही शिवसेनेला धक्का नाही. असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. सुभाष देसाई हे शिवसेना आणि ठाकरे कुटुंबांशी एकनिष्ठ आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

2005 ची पुनरावृत्ती
2005 साली राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन नव्या पक्षाची स्थापना केली होती, त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांचे पुत्र अतुल सरपोतदार, शिवसेना आमदार सीताराम दळवी यांचे पुत्र संदीप दळवी हे राज यांच्यासोबत गेले होते. आता त्याचीच पुनरावृत्ती उद्धव ठाकरेंसोबत होताना दिसत आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. आता घराघरात फूट पडताना दिसत आहे. याआधी गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात सामिल झाले आणि त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटासोबत राहिले आहेत. आता माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई हे शिंदे गटात सामिल झाले आहेत. यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

भूषण देसाई यांच्या जाण्याने शिवसेनेला काही फरक पडणार नाही
भूषण देसाई हे राजकारणात सक्रिय नाहीत. त्यांच्यावर मध्यंतरीच्या काळात काही आरोप झाले होते. त्यानंतर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असेल, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. भूषण देसाई यांच्या जाण्याने शिवसेनेला काही फरक पडणार नाही, असेही नाईक यांनी म्हटलं आहे.
भूषण देसाई हे स्वतःच्या फायद्यासाठी आणि यंत्रणांच्या दबावाला घाबरून ते शिंदे गटात जात असतील असाही आरोप नाईक यांनी केला आहे. आठ वर्षे वडिलांच्या मंत्रीमंडळाचा फायदा घ्यायचा आणि मग पक्ष सोडायचा, असे सुरू असल्याचा टोला त्यांनी भूषण देसाई यांना लगावला आहे.

शिंदे गटाच्या बाळासाहेब भवन येथे भूषण देसाई यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला आहे. सुभाष देसाई यांचे केडर हे आता भूषण यांच्यासोबत असल्याचा दावाही शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
यानंतर आता माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कुटुंबातील सदस्यांवर शिंदे गटाची नजर असल्याची माहिती आहे.

.