घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवड भीषण आगीत २२ बकऱ्या २ बोकडांचा होरपळून मृत्यू

पिंपरी-चिंचवड भीषण आगीत २२ बकऱ्या २ बोकडांचा होरपळून मृत्यू

Subscribe

पिंपरी-चिंचवड मधील लालटोपी नगर येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत मटण शॉप दुकानातील २२ बकऱ्या आणि २ बोकडांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत शेजारील मटण शॉप दुकानातील २२ बकऱ्या आणि २ बोकडांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. या आगीच्या घटनेमध्ये ५ दुकान जळून खाक झाली आहेत.या घटनेमध्ये ५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या विभागाने दिली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले?

पिंपरीचिंचवड मधील लालटोपी नगर येथे टायर विक्री आणि पंक्चर काढण्याचा व्यवसाय असणाऱ्या ठिकाणी विक्रेता दररोज दुकानात झोपायचा. मात्र काही कारणास्तव मारुती हे टायर विक्रेते या ठिकाणी झोपले नाही. त्या दरम्यान त्य़ांच्या दुकानात शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. लालटोपी नगर येथे पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मारुती टायर दुकानाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की आजूबाजूच्या दुकानात आग पसरली. अचानक लागलेल्या आगीने रोद्ररूप धारण करत शेजारील दुकानांमध्ये देखील पेट घेतला. या घटनेमध्ये आजूबाजूची पाच दुकान जळून खाक झाली. तर शानदार मटण शॉप मधील २२ बकऱ्या आणि २ पाळलेल्या बोकडांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शानदार मटण शॉप मालक आणि मारुती टायर विक्री करणाऱ्या दुकानदाराचे मोठे नुकसान झाले. दरम्यान घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देताच घटनास्थळी भोसरी, संत तुकाराम नगर, चिखली आणि प्राधिकरण येथील अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. या घटनेमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशोक कानडे,चंद्रशेखर घुले,शांताराम घारे,राजाराम चौरे,विकास तोडकर,विशाल जाधव,सुरेश मुंडे,दिलीप कांबळे,दिनेश इंगलकर यांच्यासह एकूण २५ कर्मचारी यांना एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिलवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

- Advertisement -

वाचा – कांदिवलीच्या दामू नगर येथे कपड्याच्या कारखान्याला आग

वाचा – आरेच्या आगीला संशयाचा धूर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -