घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवड मनपातील स्थायी समितीच्या चाव्या भाजपाकडे

पिंपरी-चिंचवड मनपातील स्थायी समितीच्या चाव्या भाजपाकडे

Subscribe

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी भाजपाचे नगरसेवक विलास मडिगेरी यांची निवड झाली आहे. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी विराजमान कोण होणार ही सर्वानाच उत्सुकता होती. अखेर आज भाजपाचे नगरसेवक विलास मडिगेरी यांची निवड झाली आहे. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.  त्यांना १२ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे मयूर कलाटे यांना ४ मते मिळाली. राज्यात सत्तेत सहभागी असलेली शिवसेना यांचे मत देखील मडिगेरी यांना मिळाले आहे. स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी भाजपा विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार असे दिसत होते कारण भाजपाचे शीतल शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर बंडखोरी केली होती. भाजपाचे अधिकृत उमेदवार विलास मडिगेरी यांच्या विरोधात शिंदे यांची लढत होणार अस दिसत असताना येन वेळी शीतल शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेत मडिगेरी यांचा विजय सुकर केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर कलाटे विरुद्ध भाजपा चे विलास मडिगेरी अशी लढत झाली. यात मयूर कलाटे यांना ४ मत तर १२ मत ही भाजपाच्या मडिगेरी यांना मिळाली त्यात शिवसेनेचे राहुल कलाटे यांचे मत भाजपाला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -