घरताज्या घडामोडी'भारत जोडो' यात्रा महाराष्ट्रात ४ जिल्ह्यातच गुंडाळली जाणार, भाजपची राहुल गांधींवर टीका

‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात ४ जिल्ह्यातच गुंडाळली जाणार, भाजपची राहुल गांधींवर टीका

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चे महाराष्ट्रात स्वागत करणार असल्याचं सांगितले जात आहे. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र दौऱ्याचे स्वागत करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात ४ जिल्ह्यातच गुंडाळली जाणार, अशी टीका भाजपने राहुल गांधींवर केली आहे.

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात ४ जिल्ह्यातच गुंडाळली जाणार. केरळ सारख्या लहानश्या राज्यात तब्बल २० दिवस थांबून राज्यभर दौरा करणाऱ्या राहुल गांधींनी महाराष्ट्रात मात्र ‘भारत जोडो’ यात्रा फक्त ४ जिल्ह्यातून करायचं ठरवलं आहे, असं ट्वीट भाजपने केलं आहे.

- Advertisement -

राहुल गांधींना खात्री झाली आहे की, महाराष्ट्रात त्यांच्या भारत जोडो यात्रेला प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे ३६ पैकी फक्त ४ जिल्ह्यात ते ‘भारत जोडो’ यात्रा करणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल कायम गरळ ओकणाऱ्या राहुल गांधींना महाराष्ट्रातील जनता नक्कीच अद्दल घडवेल, असंही भाजपने म्हटलं आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो यात्रे’ला सुरुवात केली. ही यात्रा कर्नाटकात आहे. तसेच या यात्रेची सांगता पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला काश्मीरमध्ये होणार आहे.


हेही वाचा : आमच्या धर्माविरोधात कोणी येत असेल तर.., आदित्य ठाकरेंचा इशारा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -