घरताज्या घडामोडीठाकरे सरकारच्या निष्क्रियतेचे आणखी १२ बळी, मुख्यमंत्री काही बोलतील का?

ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेचे आणखी १२ बळी, मुख्यमंत्री काही बोलतील का?

Subscribe

आरोपीला पाठीशी घालणे हे अतिशय खेदजनक

राज्यात वाढत्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. यामध्ये रुग्णालयातील व्हेंटिलेटर बेड, रुग्णांना लागणारा ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबईपासून जवळ असणाऱ्या नालासोपाऱ्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे एक तासात सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र मृत्यूचा सापळा बनले आहे. खंडणी वसूल करण्याच्या काळात ऑक्सिजनचा पुरेसा साठा केला असता तर कदाचित हे मृत्यू थांबवता आले असते. अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे. भाजपकडून या घटनेचा कडाडून निषेध करण्यात आला आहे. ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेचे आणखी १२ बळी गेले आहेत. आणखी किती लोकांचा जीव घेणार? असा प्रश्नही भाजपतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.

नालासोपाऱ्यातील विनायका रुग्णालयात ऑक्सिजन अभावी ७ रुग्णांचा मृत्यू झाला. यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका केली आहे. प्रभावी योजनांच्या अभावाची तिघाडीमुळे रुग्णांचे मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे नालासोपाऱ्यात झालेल्या या मृत्यूला जबाबदार कोण आहे? जनतेचा जीव म्हणजे तुमच्यासाठी कवडीमोल झाला आहे का? फेसबुक लाईव्हवर मोठंमोठ्या गप्पा मारणारे उद्धव ठाकरे आता या प्रकरणावर काही बोलतील का? असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे.

- Advertisement -

राज्याचे अर्थचक्र आणि हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांसाठी लॉकडाऊन हा पर्याय नेहमी असू शकत नाही हे ठाकरे सरकारने लक्षात घ्यावे. त्यापेक्षा सरकारने कोरोनाचे नियम आणखी कठोर करून आरोग्य सुविधा वाढवाव्या. राज्यातील ठाकरे सरकार आणि वसुली या एकाचं नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. ठाकरे सरकारच्या या भ्रष्ट कारभाराची शिक्षा आज राज्यातील जनतेला भोगावी लागत आहे. कुठे रेमडेसीवीरचा काळाबाजार तर कुठे आरोग्य अधिकारीच व्हेंटिलेटरसाठी लाच घेत आहेत आणि तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मते सर्व आलबेल आहे. अशी टीका विरोधकांनी केली आहे.

- Advertisement -

आरोपीला पाठीशी घालणे हे अतिशय खेदजनक

बलात्काराचा आरोप असणाऱ्या मेहबूब शेखला वाचविण्याचा नाहक प्रयत्न करणाऱ्या ठाकरे सरकारला पुन्हा एकदा न्यायालयाने चपराक लावली आहे. एका स्त्रीवर अन्याय झाल्यानंतरही तो व्यक्ती केवळ सत्ताधारी पक्षाचा असल्याने त्याला पाठीशी घालणे हे अतिशय खेदजनक आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -