घरताज्या घडामोडीअंधेरी पोटनिवडणुकीत 2024च्या स्थितीचा अंदाज येईल; भाजपाच्या बावनकुळेंचा ठाकरेंना टोला

अंधेरी पोटनिवडणुकीत 2024च्या स्थितीचा अंदाज येईल; भाजपाच्या बावनकुळेंचा ठाकरेंना टोला

Subscribe

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनखुळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षनेते उद्धव ठाकरे यांना चॅलेंज दिले आहे. "अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाने अर्ज मागे घेतल्यावर तुम्ही पळपुटे धोरण स्वीकारले, अशी टीका करता मात्र, 'बाळासाहेबांची शिवसेना' आणि 'भाजप' 2024मध्ये अंधेरीत काय होईल ते दिसेल'', असे चॅलेंज बावकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनखुळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षनेते उद्धव ठाकरे यांना चॅलेंज दिले आहे. “अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाने अर्ज मागे घेतल्यावर तुम्ही पळपुटे धोरण स्वीकारले, अशी टीका करता मात्र, ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि ‘भाजप’ 2024मध्ये अंधेरीत काय होईल ते दिसेल”, असे चॅलेंज बावकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरेंना चॅलेंज केले.

“शरद पवार जे बोलले ते स्क्रिप्ट होती का? शरद पवारांनी राज्याच्या राजकीय संस्कृतीचा इतिहास मांडला, त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला विनंती केली. राज ठाकरेंनी भाजपला विनंती केली. शरद पवारांच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली होती. दिवंगत आमदाराच्या पत्नीला मदत केली, संस्कृती पाळली तर ते उलटं आमच्यावरच बोंबा मारत आहेत. भाजपाने उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा प्रयत्न केला नाही. भाजपाने कधीही उद्धव ठाकरे यांना मदत केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा अपमान केला नाही. 2014 ते 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांचे म्हणणे ऐकले. लोकसभेला आणि विधानसभेला फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचे ऐकले. तुमचे जेव्हा चुकले, तुम्ही शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यासोबत जाऊन बसलात त्यामुळे तुमची अवस्था हम दो हमारे दो”, असे चंद्रशेखर बावनखुळे यांनी म्हटले.

- Advertisement -

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गुरुवारी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या अनेक निर्णयांबद्दल आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्याबद्दल आपण सरकारचे अभिनंदन करतो”, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

“राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे युद्ध पातळीवर करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचा संवेदनशील आदेश शिंदे व फडणवीस यांनी प्रशासनाला दिला आहे. सरकार संकटग्रस्त शेतकऱ्यांना तत्परतेने मदत करत आहे व त्यानुसार हा निर्णय झाला आहे”, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘एसटी’च्या ‘मोफत प्रवास योजने’ला ज्येष्ठ नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -