घरमहाराष्ट्रकेजरीवालांच्या दृष्टीने जे प्रामाणिक ते जातात जेलमध्ये; भाजपचा पटलवार

केजरीवालांच्या दृष्टीने जे प्रामाणिक ते जातात जेलमध्ये; भाजपचा पटलवार

Subscribe

दिल्लीत केजरीवाल सरकारच्या मद्य परवाना गैरव्यवहाराबाबत सीबीआयने गुन्हे दाखल केला आहे. याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि अन्य 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे सिसोदियांसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. या कारवाईनंतर सिसोदियांकडून केंद्र सरकरावर सातत्याने निशाणा साधला जात आहे.  सिसोदिया कारवाईनंतर गायब झाल्याचा आरोप भाजपने केला होता, ज्यावरून सिसोदियांनी थेट मोदींनाच आव्हान दिले होते. त्यामुळे या प्रकरणाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगतेय. सिसोदियांच्या या आरोपांवर आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. मनिष सिसोदिया म्हणतात, मी झुकणार नाही. स्वत:अरविंद केजरीवाल यांनी सिसोदिया यांना कट्टर प्रामाणिक असल्याचे सर्टिफिकेट दिले. आजकाल केजरीवाल ज्याला कट्टर प्रामाणिक असल्याचे सर्टिफिकेट देत आहेत ते नक्कीच तुरुंगात जात आहेत, विचारविनिमय केल्यानंतर तुम्ही कायद्यापुढे नतमस्तक व्हाल आणि तुमचा भ्रष्टाचारही थांबेल. अशा शब्दात भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सिसोदियांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. गौरव भाटिया आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

आप करतयं भ्रष्टाचाराचे विक्रम

- Advertisement -

गौरव भाटिया पुढे म्हणाले की, अरविंद केजरीवाल तुम्ही प्रामाणिक असाल तर जनता विचारत असलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. 24 तासांनंतर एका ट्विट रिप्लाय आला पण त्यातही संदर्भहीन गोष्टी. त्यामुळे आम्ही विचार केला की, जनतेचे प्रश्‍न पुन्हा तुमच्यासमोर मांडावेत आणि आप एक छोटा भ्रष्टाचारी पक्ष नाही तर तो भ्रष्टाचाराचे विक्रम करत आहेत हे दाखवून जगाला द्यावे.

गौरव भाटियांनी मनीष सिसोदिया यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, भाजप आम आदमी पक्षाचा भ्रष्टाचार आणि धर्मांधातील अप्रामाणिकपणाचा पर्दाफाश करत आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्याकडे जनतेच्या प्रश्नांना उत्तरे नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

मनिष सिसोदियांचा भाजपवर आरोप

यापूर्वी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर मोठा आरोप केला होता. भाजपने त्यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे, असे ट्विट त्यांनी केले होते. त्या बदल्यात सीबीआय, ईडीची सर्व प्रकरणे बंद केली जातील. असा दावाही त्यांनी केला होता.

सिसोदिया यांनी ट्विटमध्ये लिहिले की, भाजपला माझे उत्तर आहे, मी राजपूत आहे आणि महाराणा प्रताप यांचा वंशज आहे. मी माझे डोके कापून टाकीन पण भ्रष्ट आणि कारस्थान करणाऱ्यांपुढे झुकणार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते करा.


अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील निलंबनाची कारवाई रद्द होण्याची शक्यता, फिफाच्या अटी मान्य


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -