घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक जिल्ह्यात पुन्हा अग्नितांडव; १६५ ट्रॉली चारा आगीत भस्मसात

नाशिक जिल्ह्यात पुन्हा अग्नितांडव; १६५ ट्रॉली चारा आगीत भस्मसात

Subscribe

सटाणा : शहरापासून जवळच असलेल्या खमताणे गावातील एका रिकाम्या शेतात साठवून ठेवलेला मक्याचा १६५ ट्रॉली चार्‍याला आग लागल्याने तिघ भावांचा असलेला चारा जळून खाक झाला. पंचकोशीतील शेतकरी ग्रामपंचायत व सटाणा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. शेतात मानसांच्या पायाचे ठसे आढळून आल्याने पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण करून चार्‍याला आग लावणार्‍याचा शोध घ्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
खमताणे येथील विजय इंगळे यांचा १०३ ट्रॉली, वसंत इंगळे १४ तर, आबा इंगळे यांचा ४८ ट्रॉली एवढा मक्याचा चारा शेजारील रिकाम्या शेतात साठवून ठेवण्यात आला होता. बाजूलाच मक्याच्या कणसांचा ठिगारा होता. सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत. अज्ञात व्यक्तीने या चार्‍याला आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आगीच्या ज्वाला दिसताच इंगळे बंधुसह परिसरातील शेतकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. सटाणा येथील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले.

मुंजवाड, चौंधाणे, खमताणे ग्रामपंचायतीने पाण्याचे टँकर पाठवले. तोपर्यंत पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी आपापल्या टँकरांच्या मदतीने आग विझवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र, गडद अंधारामुळे आगीवर नियंत्रण मिळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. चार्‍याला आग लागल्याने प्रयत्न करुनही तब्बल १६५ ट्रॉली चारा जळून खाक झाला.
बाजूलाच असलेल्या मक्याच्या कणसांचा ढिगारा वाचवण्यात परिसरातील शेतकर्‍यांना यश आले. इंगळे बंधुंचा १६५ ट्रॉली चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे ८ लाखांहून अधिकची आर्थिक झळही इंगळे बंधुंना बसली. घटनास्थळापासून काही अंतरावर माणसाच्या पायांचे ठसे दिसून आल्याने कुणीतरी अज्ञात व्यक्तीने मुद्दाम ही आग लावण्याचा खोडसाळपणा केल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. पोलिसांनी श्वान पथकाच्या माध्यमातून या व्यक्तीचा शोध घ्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली. मंगळवारी (दि.३) दिवसभरात शहर व परिसरातील शेतकरी, सामाजिक, राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देत इंगळे बंधुंना धीर दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -