घरताज्या घडामोडीNawab Malik ED enquiry: सुडबुद्धीची कारवाई ही पक्षश्रेष्ठींना वाटणे साहजिकच, पवारांच्या प्रतिक्रियेनंतर...

Nawab Malik ED enquiry: सुडबुद्धीची कारवाई ही पक्षश्रेष्ठींना वाटणे साहजिकच, पवारांच्या प्रतिक्रियेनंतर दरेकरांची टोलेबाजी

Subscribe

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. आज पहाटे ५ वाजता ईडी नवाब मलिकांच्या घरी पोहोचले आणि त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात घेऊन गेली. माहितीनुसार, गेल्या चार तासांपासून ईडीकडून नवाब मलिकांची चौकशी सुरू आहे. ईडीच्या अशाप्रकारच्या कारवाईमुळे सध्या राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचे हे उदाहरण आहे. हे आज ना उद्या घडले याची आम्हाला खात्री होती. सत्य बोलणाऱ्यांना त्रास दिला जातो.’ शरद पवारांच्या या प्रतिक्रियेनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टोलेबाजी लगावली आहे. आपल्या पक्षातील नेत्यांवर अशाप्रकारची चौकशी होत असल्यावर पक्षातील इतर नेत्यांना सूडबुद्धीची कारवाई असल्यासारखेच वाटते, असे दरेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

‘भाजप विरोधी बोलतायत म्हणून कुठल्याही यंत्रणांना अशाप्रकारची कारवाई करता येत नाही, असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे कोणीही काही बोललं तरीही तपास यंत्रणा आपल्या चौकटीत, आपल्याकडे असणाऱ्या संदर्भाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई करत असतात. त्याच्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाचे नेते आपल्या पक्षाच्या नेत्याची, कार्यकर्त्याची अशा प्रकरणात चौकशी झाल्यावर त्याठिकाणी सूडबुद्धीची कारवाई आहे, अशाचं प्रकारची भूमिका किंवा वक्तव्य येतं असतात,’ असे प्रवीण दरेकर शरद पवारांनी मांडलेल्या भूमिकेवर म्हणाले.

- Advertisement -

जनतेला एवढं मुर्ख समजण्याचं दुसाहस मविआ सरकारच्या नेत्यांनी करू नये – राम कदम

भाजप आमदार राम कदम म्हणाले की, ‘दाऊदचा क्रूर साथीदार, मुंबईमध्ये जे १२ बॉम्बब्लास्ट झाले त्याचा प्रमुख गुन्हेगार जेव्हा तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याची जमीन राष्ट्रवादीचे नेते विकत घेतात. हजारो निरपराध लोकांना बॉम्बस्फोटात क्रूरतेने मारलंय, तो दाऊदचा पार्टनर आहे, त्याची जमीन राज्य सरकारजवळ होणार आहे. तसेच दाऊदसंबंध हे सर्व माहित असताना सुद्धा कवडीमोल भावाने राष्ट्रवादीचे नेते ती जमीन विकत घेतात. स्वाभाविक पणे जेव्हा याची कागदपत्रे देशासमोर आली, तर ईडी कारवाई करणार. आता ईडी कारवाई करतेय, तर महाराष्ट्रातील तिन्ही पक्षातील नेते म्हणतात ही राजकीय सुडापोटी कारवाई. तुम्ही दाऊदच्या साथीदाराची जमीन घ्याल, सरकारजमा होणारी तुम्ही जमीन घ्याल आणि ही सुडापोटी कारवाई? जनतेला एवढं मुर्ख समजण्याचं दुसाहस महाराष्ट्राच्या सरकारच्या नेत्यांनी करू नये. याची सत्यता आणि नैतिकता एकदा तपासून पाहावी. ही लढाई कोणा एका पक्षाच्या किंवा व्यक्तीविशेषच्या विरोधातील नाही.’


हेही वाचा – Nawab Malik ED enquiry : नवाब मलिक यांच्यावर आज ना उद्या कारवाई होईल, याबाबत कल्पना होती – शरद पवार


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -