Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Farhan Shibani Wedding : लग्नानंतर शिबानीने बदलले नाव, आता शिबानी दांडेकर नाही...

Farhan Shibani Wedding : लग्नानंतर शिबानीने बदलले नाव, आता शिबानी दांडेकर नाही तर …

Subscribe

दांडेकरांची शिबानी आणि अख्तरांची सून झाल्यानंतर शिबानीच्या आयुष्यातील अनेक गोष्टी हळू हळू बदलण्यास सुरुवात झाली आहे. लग्न होताच शिबानीने तिचे नाव बदलले आहे. शिबानीच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये शिबानीचे लग्नानंतर नाव अपडेट करण्यात आले आहे.

Farhan Shibani Wedding :  अभिनेत्री शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. खंडाळ्याच्या फार्महाऊसवर दोघांचा शानदार विवाह सोहळा पडला आहे. लग्नाचे फार सुंदर फोटो फरहान आणि शिबानी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दांडेकरांची शिबानी आणि अख्तरांची सून झाल्यानंतर शिबानीच्या आयुष्यातील अनेक गोष्टी हळू हळू बदलण्यास सुरुवात झाली आहे. लग्न होताच शिबानीने तिचे नाव बदलले आहे. शिबानीच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये शिबानीचे लग्नानंतर नाव अपडेट करण्यात आले आहे. शिबानीचे नाव आता शिबानी दांडेकर नसून शिबानी दांडेकर – अख्तर असे झाले आहे.

- Advertisement -

शिबानी आणि फरहान यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. जवळचे नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत शिबानी फरहानचा लग्नसोहळा पार पडला. त्यांनी आधी रजिस्टर पद्धतीने लग्न करुन खंडाळ्याच्या फार्महाऊसवर लग्नाची पार्टी केली. शिबानी फरहानच्या लग्नाचे खास फोटो एकदा पाहाच ( फोटो – शिबानी दांडेकर फरहान अख्तर यांच्या इन्स्टाग्रामवरुन साभार )

 

- Advertisement -


हेही वाचा – Farhan Akhtar आणि Shibani Dandekar अखेर अडकले लग्नबंधनात

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -